Delhi Shocker: BJPच्या महिला कार्यकर्ताची दिल्लीत निर्घृण हत्या, संशयित आरोपीची आत्महत्या, तपास सुरु
उत्तर दिल्लीतील नरेला भागात शाळेच्या आवारात भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे.
Delhi Shocker: उत्तर दिल्लीतील नरेला भागात शाळेच्या आवारात भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी पोलिसांनी या प्रकरणी माहिती उघड केली आहे. महिला गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती अचानक मृतदेह सापडल्याने सर्वांना धक्का लागला आहे. मृत महिला खासगी शाळेत शिक्षिका होती. धक्कादायक म्हणजे मृत महिलेच्या मित्राने आणि संशयित आरोपीने देखील आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- नोकरी जाण्याच्या भीतीने Paytm कर्मचाऱ्याची आत्महत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वर्षा पवार (वय २८) आहे. मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे वर्षा हीच्या मित्राने रेल्वेसमोर येऊन उडी मारून आत्महत्या केली. सोहनलाल असं त्याचे नाव आहे. हरसाना सोनीपतजवळ ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. वर्षा काही दिवसांपासून बेपत्ता होती. या संदर्भाची माहिती वर्षाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती.
दिल्ली के नरेला इलाके में BJP कार्यकर्ता वर्षा पवार की हत्या। अपने ही प्ले स्कूल की स्टेशनरी शॉप के अंदर कल डेडबॉडी मिली है। वर्षा के बिजनेस पार्टनर सोहनलाल ने सोनीपत में ट्रेन के आगे कूदकर जान दी। अफेयर में वारदात का शक है। #Delhi pic.twitter.com/BztqLJBOWH
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 29, 2024
वर्षाची हत्या सोहनलाल याने केली असा संशय वर्षाच्या कुटुंबियानी व्यक्त केला आहे. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. वर्षाचा खून झाल्याचे समजताच कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 29, 2024 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

