Bomb Blast Threat: देशातील Patna, Jaipur, Coimbatore, Vadodara यांसारख्या अनेक विमानतळांना बॉम्बची धमकी; कडक सुरक्षा उपाय लागू

सुदैवाने, कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नाही. आज पहाटे चेन्नईच्या कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाणाऱ्या अमिरातीच्या विमानात बॉम्ब असल्याची ई-मेल पाठवण्यात आली. त्यानंतर जयपूर विमानतळ अधिकाऱ्यांना विमानतळावर स्फोटके लपवून ठेवली असल्याचा मेल प्राप्त झाला.

Image Credit: Pixabay

Bomb Blast Threat: भारतामधील पाटणा, कोईम्बतूर, वडोदरा, दिल्ली, चेन्नई आणि जयपूर अशा महत्वाच्या विमानतळांना मंगळवारी बॉम्बच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाले, ज्यामुळे उड्डाणांना विलंब झाला. ईमेलद्वारे पाठवलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे मंगळवारी देशभरातील अनेक विमानतळांवरील फ्लाइट ऑपरेशन विस्कळीत झाले. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून प्रभावित विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे उड्डाण वेळापत्रकात विलंब होत आहे. हे मेल प्राप्त झाल्यानंतर कसून तपासणी केली असता, या धमक्या फसव्या असल्याच्या आढळल्या.

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, आज तब्बल 40 विमानतळांवर बॉम्बची धमकी देणारे ई-मेल आले. सुदैवाने, कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नाही. आज पहाटे चेन्नईच्या कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाणाऱ्या अमिरातीच्या विमानात बॉम्ब असल्याची ई-मेल पाठवण्यात आली. त्यानंतर जयपूर विमानतळ अधिकाऱ्यांना विमानतळावर स्फोटके लपवून ठेवली असल्याचा मेल प्राप्त झाला.

पहा पोस्ट-

त्यानंतर पाटणा विमानतळाबाबत असा इ-मेल समोर आला. संचालकांच्या म्हणण्यानुसार, धमकीनंतर जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले होते. त्याचप्रमाणे गुजरातमधील वडोदरा आणि कोईम्बतूर विमानतळानेही विमानतळ अधिकाऱ्यांना बॉम्बच्या धमकीच्या ईमेलला प्रतिसाद म्हणून सुरक्षा प्रोटोकॉल कडक केले. या घटनेनंतर सर्व विमानतळांवर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र कुठेही संशयास्पद वस्तू दिसली नाही. यापूर्वी एप्रिलमध्येही विमानतळांवर बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्या होत्या.

विमानतळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाल्याने, प्रवाशांमध्ये दहशत आणि भीती पसरली होती. आता ज्या व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवला आहे त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास यंत्रणा ईमेलचा स्रोत शोधत आहेत. असे सांगितले जात आहे की, अज्ञात व्यक्तीने देशातील 40 विमानतळांवर धमकीचा ईमेल पाठवला, सर्व ईमेलची भाषा आणि शैली सारखीच आहे.