Bomb Blast in Delhi: कुलभूषण जाधव अपहरण प्रकरणाशी जैश उल हिंद संघटनेचा संबंध
या समूहाचा दावा आहे की, ही संघटना सिस्तान आणि बलुचिस्तानसाठी लढत आहे. इरानचे म्हणने आहे की, या समूहाचा अल कायदा या संघटनेशीही संबंध आहे
राजधानी दिल्लीच्या अतिशय सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या इस्त्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. जैश-उल-हिंद (Jaish-Ul-Hind) या संघटनेने बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. याच जैश-उल-हिंद संघटनेचा संबध कुलभूषण जाधव अपहरण प्रकरणाशी आहे. जैश उल हिंद (Bomb Blast in Delhi) ही एक दहशतवादी संघटना (Terrorist Organizations) म्हणून ओळखली जाते. या संघटनेनेच भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना चाबहार बंदरावरुन ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्याच्या हवाली केले होते. गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत म्हटले आहे की, ही संघटना जैश-उल-हिंद किंवा जैश-अल-अद्ल नावाने ओळखली जाते. ही संघटना दक्षिण-पूर्व इराणमध्ये सक्रीय आहे. या संघटनेचा प्रभाव पाकिस्तानच्या सीमावर्ती भागाला लागून आहे.
अशी एखादी संघटना अस्तित्वात आली असेल तर तो भारतासाठी धोका मानला जात आहे. या समूहाचा दावा आहे की, ही संघटना सिस्तान आणि बलुचिस्तानसाठी लढत आहे. इरानचे म्हणने आहे की, या समूहाचा अल कायदा या संघटनेशीही संबंध आहे. सन 2012 मध्ये जुंदाल्लाह नावाच्या एका सुन्नी कट्टरपंती समूहाने या संघटनेची स्थापना केली होती. (हेही वाचा, Delhi IED Blast: इज्राईल दूतवासाजवळ झालेल्या स्फोटाबद्दल मोठा खुलासा, 'हा फक्त ट्रेलर' असल्याचे लिहिले होते पत्रात)
दरम्यान या संघटनेला ईरान या देशाने दहशतवादी संघटना म्हणून घोषीत केले आहेच. परंतू, जपान, न्यूझीलंड आणि अमेरिकेनेही दहशतवादी संघटना म्हणून घोषीत केले आहे. या संघटनेने दिल्ली येथील इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून या संघटनेने धमकीही दिली आहे की ही केवळ सुरुवात आहे. यापुढे आम्ही भारतातील मोठ्या शहरांना लक्ष्य करणार आहोत. भारतातील काही शहरांचा फोटोही संघटनेने मेसेजसोबत पोस्ट केला आहे.
दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सुरु आहे. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या बॉम्बस्फोटात डायरेक्शनल आईईडी वापरण्यात आल्याची माहिती आहे. स्फोटाची दिशा एकाच म्हणजे केवळ रस्त्याच्या बाजूला करण्यात आली होती. या आयडी स्फोटात इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरण्यात आले आणि हे सर्किट बॅटरीद्वारे नियंत्रीत केले जात होते.