BMW Hits Auto-Rickshaw In Delhi: दिल्लीत बीएमडब्ल्यूची ऑटो-रिक्षाला धडक; अपघातात 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 4 जखमी

या अपघातात रिक्षाने प्रवास करत असलेल्या एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून इतर चार जण जखमी झाले आहेत.

Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

BMW Hits Auto-Rickshaw In Delhi: दिल्लीतून अत्यंत दुर्दैवी घटना समोर येत आहे. मध्य दिल्लीच्या टिळक मार्गावर बीएमडब्ल्यू कार (BMW Car)ने ऑटो-रिक्षाला (Auto-Rickshaw) धडक दिली. या अपघातात (Accident) रिक्षाने प्रवास करत असलेल्या एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून इतर चार जण जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता नीरज कुमार त्याचे वडील सच्चिदानद, पत्नी कुमारी सलमा आणि दोन मुले यशराज आणि हंसराज नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून ऑटो रिक्षात त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी ही घटना घडली.

बीएमडब्ल्यूची रिक्षाला धडक -

टिळक रोडवरील ट्रॅफिक लाईटजवळ बीएमडब्ल्यू कारने ऑटो-रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षातील 63 वर्षीय व्यक्ती खाली पडला. या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, बीएमडब्ल्यू कारने आधी ट्रॅफिक लाईट असलेल्या खांबाला धडक दिली. त्यानंतर तेथे थांबलेल्या ऑटो रिक्षाला धडक दिली. (हेही वाचा -Noida Accident Viral Video: वाहनाने धडक दिल्याने एलिव्हेटेड रोडच्या पिलर मध्ये अडकली तरूणी; सुदैवाने सुखरूप झाली सुटका (Watch Video))

प्राप्त माहितीनुसार, रिक्षातील पाचही प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. तथापि, रिक्षा चालकाने पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. या अपघातात सच्चिदानंद आणि त्याचा नातू यासराज गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी उपचारादरम्यान सच्चिदानंद यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - BSF Soldiers Bus Accident: निवडणूक ड्युटीवर जाणाऱ्या बीएसएफ जवानांच्या बसला अपघात; तीन जवानांचा मृत्यू, 26 जखमी)

हिमाचल प्रदेश नोंदणी क्रमांक असलेल्या बीएमडब्ल्यू कारच्या चालकाची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. बीएनएसच्या कलम 281 (बेदारकपणे वाहन चालवणे) आणि 125 (अ) (इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारी कृती) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत.