IPL Auction 2025 Live

Explosion In Howrah Mail Coach At Punjab: पंजाबमध्ये हावडा मेलच्या डब्यात स्फोट; 4 जण जखमी

जीआरपीचे पोलिस उपअधीक्षक जगमोहन सिंग यांनी सांगितले की, जखमींना फतेहगढ साहिब सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रेल्वेच्या जनरल क्लासच्या डब्यात प्लास्टिकच्या बादलीत स्फोट झाला, ज्यामध्ये काही फटाके ठेवण्यात आले होते.

Explosion In Howrah Mail Coach At Punjab (फोटो सौजन्य - फेसबुक, Pixabay)

Explosion In Howrah Mail Coach At Punjab: पंजाब (Punjab)मध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. फतेहगढ जिल्ह्यातील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ हावडा मेलच्या डब्यात स्फोट (Explosion In Howrah Mail Coach) होऊन चार जण जखमी झाले. अमृतसरहून हावडाकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 13006 च्या जनरल क्लासच्या डब्यात हा स्फोट झाला. सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. रेल्वेच्या डब्यात फटाक्यांनी भरलेली प्लास्टिकची बादली फुटली.

प्लास्टिकच्या बादलीत झाला स्फोट -

या घटनेत एका महिलेसह चार प्रवासी जखमी झाले आहेत. जीआरपीचे पोलिस उपअधीक्षक जगमोहन सिंग यांनी सांगितले की, जखमींना फतेहगढ साहिब सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रेल्वेच्या जनरल क्लासच्या डब्यात प्लास्टिकच्या बादलीत स्फोट झाला, ज्यामध्ये काही फटाके ठेवण्यात आले होते. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. (हेही वाचा -Tragic Diwali In Uttar Pradesh: सहारनपूरमध्ये दिवाळीच्या सणाला गालबोट! 8 वर्षाच्या मुलाने फटाक्यावर ठेवला काचेचा ग्लास; स्फोटानंतर गळ्यात काचेचे तुकडे घुसल्याने मृत्यू)

दरम्यान, या स्फोटोमुळे रेल्वेच्या बोगीत धुराचे लोळ उठले. ट्रेनमध्ये स्फोट झाल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. त्यामुळे प्रवाशांनी उड्या मारायला सुरुवात केली. या घटनेदरम्यान सुमारे अर्धा तास ट्रेन सरहिंद स्थानकावर थांबवण्यात आली होती. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा -Mumbra-Shilphata Fire: मुंब्रा-शिळफाटा परिसरात सिलेंडरचा स्फोट; आगीत चार दुकाने जळून खाक)

तथापी, या घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे पोलीस उपअधीक्षक जगमोहन सिंग त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बोगीची पाहणी केली. तपासात एक प्रवासी त्याच्या सामानासह फटाके घेऊन त्याच्या गावी जात होता. त्याने फटाके बादलीत ठेवले होते. बोगीतील विद्युत शॉर्टसर्किटमुळे फटाक्यांना आग लागली आणि स्फोट झाला. या घटनेत एका दाम्पत्यासह चार प्रवासी जखमी झाले.