'मोबाईल फोनवर सहज Porn Video उपलब्ध होत असल्याने घडत आहेत बलात्कार'- भाजप मंत्री Harsh

एखादा बापच मुलीवर बलात्कार करत असेल तर हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे

Image For Representation (Photo Credit: File Photo))

बलात्कारामागे (Rape) किंवा त्याबाबतच्या मानसिकतेमागे नक्की काय कारण असेल याबाबत बराच अभ्यास झाला आहे. आता गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी (Minister Harsh Sanghavi) म्हणतात की, मोबाईलवर सहज उपलब्ध होणारे अश्लील व्हिडिओ बलात्कारासाठी जबाबदार आहेत. संघवी म्हणाले की, बलात्काराचे दुसरे महत्त्वाचे कारण ओळखीचे लोक आहेत, ज्यात शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश असू शकतो. अशा घटना समाजाला लागलेला कलंक असल्याचेही ते म्हणाले.

संघवी म्हणाले की, नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते, ज्यामध्ये बलात्कारासाठी मोबाईल फोन आणि ओळखीचे लोक कसे जबाबदार आहेत हे उघड झाले आहे. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही नेहमीच बलात्काराच्या घटनांसाठी पोलिसांना दोषी ठरवतो, मात्र अशा घटनांसाठी फक्त पोलिसांनाच दोष देता येणार नाही.’ संपूर्ण देशात आपला गुजरात सर्वात सुरक्षित असल्याचा दावा संघवी यांनी केला. ते पुढे म्हणाले, ‘जर एखादा बाप आपल्या चिमुरडीवर बलात्कार करतो,  त्यामागचे कारण मोबाईल फोन आहे.

हर्ष संघवी असेही म्हणाले की, अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात बलात्काराच्या घटनांना लोकांची सामाजिक विकृती कारणीभूत आहे. एखादा बापच मुलीवर बलात्कार करत असेल तर हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. ते म्हणाले, ‘बहुतेक लोक मोबाईलवर पॉर्न पाहतात. मोबाईलवर पॉर्न सहज उपलब्ध आहे, त्यामुळे बलात्कार होतात. लोकांना मोबाईलवरील सहज पॉर्नचा एक्सेस थांबवला पाहिजे.’ (हेही वाचा: Murder: विवाहबाह्य संबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीची हत्या, पती अटकेत)

दरम्यान, 8 डिसेंबर 2021 रोजी सुरतच्या पंडसेरा भागात अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले होते. तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात पॉर्न व्हिडिओही सापडले आहेत. त्याचवेळी, दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी हा निकाल बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif