Bird Flu Outbreak Hits Jharkhand: झारखंडमध्ये बर्ड फ्लू उद्रेक, चिकन विक्रीवर बंदी; 4,000 हून अधिक कोंबड्यांना जीवे मारले
झारखंड राज्यात, खास करुन रांची शहरामध्ये बर्ड फ्लू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने चिकीन विक्री करण्यावर बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर प्रादेशिक पोल्ट्री फार्म आणि इतरही कुक्कुटपालन व्यवसायक असलेल्या ठिकाणांवरील जवळपास 4000 कोंबड्या आणि तत्सम पक्षी ठार मारले आहेत.
Jharkhand Bird Flu Alert: झारखंड राज्यात, खास करुन रांची शहरामध्ये बर्ड फ्लू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने चिकीन विक्री करण्यावर बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर प्रादेशिक पोल्ट्री फार्म आणि इतरही कुक्कुटपालन व्यवसायक असलेल्या ठिकाणांवरील जवळपास 4000 कोंबड्या आणि तत्सम पक्षी ठार मारले आहेत. सोबतच या पक्षांची शेकडो अंडीही नष्ट करण्यात आहेत. तसेच, बर्ड फ्लूचे प्रभावक्षेत्र असलेल्या क्षेत्राच्या 1-किलोमीटरच्या परिघात कोंबडी, पक्षी आणि अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
कोंबड्यांसह सुमारे 4000 पक्षी मारले
अधिकाऱ्यांनी रांचीच्या होटवार येथील प्रादेशिक पोल्ट्री फार्ममध्ये एव्हीयन फ्लूच्या संसर्गाची पुष्टी केली. ज्यामुळे कोंबड्यांसह सुमारे 4000 पक्षी मारले गेले आणि शेकडो अंडी नष्ट झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्रेकावरील उपायोजना म्हणून, मानक कार्यप्रणालीची रूपरेषा देणाऱ्या सरकारी आदेशात प्रादेशिक पोल्ट्री फार्ममध्ये उर्वरित पोल्ट्री (कोंबड्या) मारण्यासाठी तपशीलवार योजना आखण्यात आल्या आहेत. या योजना काही दिवसांत राबविल्या जातील. शास्त्रोक्त पद्धतीने मान्यता दिलेल्या पध्दतीने मारल्या जाणाऱ्या पक्ष्यांची विल्हेवाट लावली जाईल. (हेही वाचा, Mother Hen Fight With Snake Viral Video: कोंबडीने ठेचला नागाचा फणा, पिल्लांना वाचविण्यासाठी आईचा रुद्रावतार, पाहा व्हिडिओ)
जिल्हा प्रशासनाच्या पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण
अधिकाऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त संक्रमणाची ओळख पटवण्यासाठी आणि आवश्यक तेथे कोंबड्या मारण्याच्या उपायांसह पुढे जाण्यासाठी उद्रेक ठिकाणापासून 1-किलोमीटरच्या परिघात सखोल सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, 10-किलोमीटर परिघामध्ये पसरलेल्या पाळत ठेवण्याचे क्षेत्र प्राधिकरणांद्वारे नकाशावर सीमांकित केले जाईल. सरकारी आदेश आणि पुढील सूचना मिळेपर्यंत पोल्ट्री उत्पादनांची खरेदी आणि विक्री पूर्णपणे थांबवण्याचे आदेश दण्यात आले आहेत. पक्षी आणि अंडी यांच्या उपस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रभावित 1-किलोमीटर परिघात जिल्हा प्रशासनाच्या पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. कोणतीही घरे, दुकाने किंवा विक्रेते अशा वस्तू ठेवत असल्याचे आढळल्यास त्यांनी सर्वेक्षण पथकांना सहकार्य करणे आणि त्यांना मारण्यासाठी त्यांना समर्पण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (हेही वाचा, Biggest Egg In India Video: अंडे का फंडा! कोल्हापुरात सापडलं देशातील सर्वात मोठं अंड, पहा व्हिडीओ)
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना अवाहन केले आहे की, कोठेही कोंबडी अथवा मृत पक्षी आढळून आल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने द्यावी. दरम्यान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने राज्याला त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. भोपाळमधील ICAR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय-सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस (NIHSAD) कडे पाठवलेल्या नमुन्यांमध्ये H5N1, पक्ष्यांमध्ये रोग निर्माण करणारा एव्हियन इन्फ्लूएंझा ए व्हायरसचा प्रकार असल्याची पुष्टी झाली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हा उद्रेक इतरत्र पसरु नये यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)