Bihar Crime: बिहारमध्ये घरात झोपलेल्या तरुणाची हत्या, युट्युबवरील प्रसिद्धीमुळे खुन झाल्याचा बहिणीचा आरोप
दरम्यान या घटनेचा पोलीस संपुर्ण पणे तपास करत आहेत.
बिहारमधील नालंदा येथे एका 19 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि दोन बहिणींना आधार देत, उदरनिर्वाहासाठी हरधन शिकवणी द्यायचा आणि यूट्यूबवर रील अपलोड करायचा. हरधनच्या बहिणीने आरोप केला आहे की, यूट्यूबवरील त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याची हत्या करण्यात आली आहे. (Fake Passport Scam: बनावट पासपोर्ट घोटाळ्याप्रकरणी बंगाल, सिक्कीममधील 50 हून अधिक ठिकाणी सीबीआयचे छापे, 2 जणांना अटक)
घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी आरोपीने घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केला. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस संपुर्ण पणे तपास करत आहेत. पोलिसांनी घटनेनंतर आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन पिडितेच्या नातेवाईकांना दिला आहे.
हत्या झालेला 19 वर्षीय हरधन हा यूट्यूबवर रील आणि व्हिडिओ अपलोड करायचा यामुळे त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती, या वाढत्या लोकप्रियतेमुळेच आपल्या भावाची हत्या झाली असल्याचा आरोप हरधनच्या बहिणीने केला आहे.