Bihar Horror: पूर्णिया येथे 10 वर्षीय मुलीवर बलात्कार; रक्तस्त्राव होऊ लागल्यावर गुप्तांगात टाकली माती
पीडितेवर अत्याचार करून दिलखुश फरार झाला. दुसरीकडे इतर मुलींनी पीडितेच्या घरी पोहोचून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचे नातेवाईक तिच्या शोधासाठी शेतात गेले असता त्यांना पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली.
बिहारच्या (Bihar) पूर्णिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपीने क्रौर्याची परिसीमा ओलांडून पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये माती आणि वाळू टाकल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना जिल्ह्यातील डगरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. ही घटना घडली तेव्हा मुलगी घराबाहेर मैत्रिणींसोबत खेळत होती. आरोपी तेथे आला आणि इतर मुलींना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. बाकीच्या मुली निघून गेल्यावर आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले.
पीडितेचे वय 10 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. दिलखुश जररा असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 26 वर्षे आहे. पोलिसांनी दिलखुशला अटक केली आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवार, 7 एप्रिल 2023 रोजी घडली. माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलगी घराजवळ तिच्या 5-6 मैत्रिणींसोबत खेळत होती. यादरम्यान पीडितेच्या शेजारी राहणारा दिलखुश तेथे आला. मुलीच्या आजूबाजूला तिच्या घरातील कोणी नसल्याचे पाहून तो मुलीला स्वतःकडे खेचू लागला.
दिलखुशची ही कृती पाहून बाकीच्या मुली घाबरल्या त्यानंतर आरोपीने या मुलींना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलगी एकटी राहिल्यानंतर त्याने पीडितेचा चेहरा दाबून तिला शेतात नेण्यास सुरुवात केली. अखेर दिलखुशने मुलीला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने दिलखुशपासून स्वतःची सुटका करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती अपयशी ठरली. आरोपीच्या या क्रूरतेमुळे मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येऊ लागल्यावर दिलखुशने त्यात माती आणि वाळू टाकली. (हेही वाचा: Uttar Pradesh: अभ्यास करत नाही म्हणून मुलाचे हात बांधून छताला लटकवले, आरोपी वडिलांना अटक)
पीडितेवर अत्याचार करून दिलखुश फरार झाला. दुसरीकडे इतर मुलींनी पीडितेच्या घरी पोहोचून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचे नातेवाईक तिच्या शोधासाठी शेतात गेले असता त्यांना पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली असून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलखुशला अटक केली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2023 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

