Bihar Assembly Elections 2020: बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या दुस-या टप्प्यात 94 जागांसाठी आज होणार मतदान
या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बिहार मधील अत्यंत चुरशीची समजली जाणारी विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) च्या दुस-या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. या टप्प्यात आज 94 जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदार केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तसेच मतदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची ही काळजी घेतली जात आहे. मतदारराजाही कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व नियमांचे पालन करुन मतदान करण्यास येत आहे. या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. त्यादृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान आज 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होत आहे. यात टप्प्यात एकूण 1463 उमेदवारांचे भविष्य आजच्या मतदानावर अवलंबून असणार आहे. यात 1316 पुरुष तर 146 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तसेच एक तृतीयपंथीयाचा पण समावेश आहे. दुस-या टप्प्यात 2 कोटी 85 लाखांहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील. हेदेखील वाचा-Bihar Assembly Election 2020: नीतीश कुमार यांचा नवा डाव, 'लोकसंख्येच्या आधारे आरक्षण द्या'; देशभर चर्चा
या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य नेत्यांनी मतदारांना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन मतदान करा असे आवाहन केले आहे. तसेच 'पहले मतदान, फिर जलपान' असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नागरिकांना मतदान करा असे आवाहन केले आहे. बिहार हे पहले राज्य आहे जेथे कोरोना व्हायरस दरम्यान मतदान केले जात आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि मतदारकर्ता या दोघांसाठी हे मोठे आव्हान असणार आहे.