Bihar Assembly Election 2020: 'काठीने ताप बघणे' ऐकले असेल 'काठीने मतदान करणे' ऐकले आहे का? म्हणेज बिहार विधानसभा निवडणुकीत असे घडणार

आर. श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी मतदारांना मतदान करते वेळी एक विशिष्ठ प्रकारची छोटी काठी/छडी दिली जाईल. जेणेकरुन मतदानही पार पडेल आणि मतदाराचा इव्हीएमसोबत थेट संबंधही येणार नाही. प्रत्येक मतदार दिलेल्या काठीनेच इव्हीएमचे बटन दाबेल याची खात्री करुन घेतली जाईल.

Elections | (Photo Credits: PTI)

'काठीने ताप बघणे' अशी एक म्हण मराठीमध्ये प्रचिलित आहे. पण काठीने मतदान करने हे पहिल्यांदाच ऐकालयाल मिळते आहे. होय, बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) तोंडावर आली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडणार की पुढे ढकलली जाणार याबाबत उत्सुकता आहेच. मात्र, असेही सांगितले जात आहे की, विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी मतदारांना काठीचा अथवा छडीचा (Stick) वापर करावा लागणार आहे. होय, मतदान करतेवेळी कोरोना व्हायरस संसर्गापासून बचाव करण्यासाठी निवडणूक आयोग अशी काही शक्कल लढवत आहे.

बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच. आर. श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी मतदारांना मतदान करते वेळी एक विशिष्ठ प्रकारची छोटी काठी/छडी दिली जाईल. जेणेकरुन मतदानही पार पडेल आणि मतदाराचा इव्हीएमसोबत थेट संबंधही येणार नाही. प्रत्येक मतदार दिलेल्या काठीनेच इव्हीएमचे बटन दाबेल याची खात्री करुन घेतली जाईल. (हेही वाचा, Election Rule: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 65 वर्षांवरील व कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती Postal Ballots द्वारे करू शकतात मतदान)

दरम्यान, ज्येष्ठ मतदारांना टपाली मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, किती मतदार हा पर्याय स्वीकारतील याबबत आताच काही सांगता येणार नाही. या वेळी मतदान प्रक्रिया ही नेहमीपेक्षा काहीशी वेगळी आणि अधिक आव्हानात्मक असेल, असेही एच. आर. श्रीवास्तव यांनी सांगितले. मतदानाला येताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. जे मास्क लावणार नाहीत त्यांना खादीचा तीनपदरी मास्क देण्यात येईल, असेही श्रीवास्तव म्हणाले.