Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ट्विटरने लॉन्च केले Search Prompt

बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

Twitter | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) च्या पार्श्वभूमीवर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) ने शुक्रवारी भारतीय निवडणूक आयोगासोबत एक सर्च प्रॉम्प्ट लॉन्च (Twitter Launches Search Prompt) केले आहे. ज्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधीत अधिक विश्वसनिय आणि अधिकृत बातम्या नागरिकांना मिळू शकतील. नवे सर्च प्रॉम्प्ट उमेदवारांची यादी, मतदानाची तारीख, मतदानाची तारीख, ईव्हीएमवर मतदान आणि निवणुकीसंबंधी अधिक माहिती अचूकपण देऊ शकणार आहे. या सर्च प्रॉम्प्टला 'गेट द लेटेस्ट अपडेट्स' असे नाव देण्यात आले आहे. हे प्रॉम्प्ट इंग्रजी आणि हिंदी भाषांसह इतर जवळपास 30 भाषांमध्ये हॅशटॅगसह कार्यरत करण्या आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत जाईल तसे ट्विटर प्रॉम्प्टच्या माध्यमातून निवडणुकीसंबंधी अधिक अधिकृत माहिती वेळेवर लोकांपर्यंत पोहोचेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमी देशातील ही पहिली निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. (हेही वाचा, US President Donald Trump यांच्या ब्लॅक समर्थकांचे फेक अकाऊंट्स ट्विटरकडून बॅन)

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.