Bihar Assembly Election 2020: बिहारवासियांना कोरोना लस मोफत देण्याच्या भाजपच्या अश्वासनाचा शिवसेनेकडून समाचार; विचारला नेमका प्रश्न

या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, गुलबराव पाटील, चंद्रकांत खैरे, स्वाती चतुर्वेती, यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

Shiv Sena | (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आटोक्यात आणणारी लस अद्यापही निर्मानाधीन आहे. त्यामुळे अद्याप तरी जगभरात कोरोना व्हायरस लस (Coronavirus Vaccine) अस्तित्वात आली नाही. तरीही विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) जाहीरनाम्यात (BJP Manifesto) भाजपने मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. यावरुन भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना (Shiv Sena) प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्विटरवरुन हल्ला चढवत म्हटले आहे की, कोरोना व्हायरस लस अद्याप अस्तित्वात आली नाही. परंतू, निवडणुकीत ती एक 'जुमला' मात्र होऊन बसली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्वटमध्ये म्हटले आहे की, 'लस अद्याप आली नाही. तोपर्यंत ती निवडणुकीत अश्वासनांची खैरात मात्र होऊन बसली आहेच. केंद्र सरकारने सर्व राज्यांतील नागरिकांना समान न्याय लावला पाहिजे'.

बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. या जाहिरनाम्यात भाजपने कोरोना व्हायरस मोफत लसीकरणासोबतच इतरही अनेक घोषणा केल्या आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यात 5 सूत्र, 1 लक्ष्य, 11 संकल्प मांडला आहे. मात्र, या सर्वात सर्वांना मोफत कोरोना व्हायरस नियंत्रण लसीकरण आणि 19 लाख नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिले आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: 'तुतारी फुंकणारा मावळा' बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला देणार साथ?)

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 50 उमेदवार उतरवले आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, गुलबराव पाटील, चंद्रकांत खैरे, स्वाती चतुर्वेती, यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबरला 71 मतदारसंघात , दुसऱ्या टप्प्यासाठी 3 नोव्हेंबरला 94 मतदारसंघात आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 7 नोव्हेंबरला 78 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. सर्व टप्प्यांची एकत्रच म्हणजे 10 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.