Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धक्का; 22 उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते

बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या (Bihar Assembly Election 2020) 243 जागांवरील मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत सर्व जागांवर सुरुवातीचा ट्रेंड समोर आला आहे. या ट्रेंडने एक्झिट पोलद्वारे केलेली भविष्यवाणी हादरली आहे.

shivsena | (Photo Credit: File Photo)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या (Bihar Assembly Election 2020) 243 जागांवरील मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत सर्व जागांवर सुरुवातीचा ट्रेंड समोर आला आहे. या ट्रेंडने एक्झिट पोलद्वारे केलेली भविष्यवाणी हादरली आहे. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार राज्यात पुन्हा एकदा एनडीए (NDA) आघाडीचे सरकार दिसत आहे. मात्र, महागठबंधन आणि एनडीए (भाजप आणि जेडीयू) यांच्यात काट्याची स्पर्धा दिसून येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेची (Shiv Sena) स्थिती अतिशय वाईट दिसत आहे. आतापर्यंत मोजलेल्या मतांनुसार शिवसेनेची कामगिरी नोटा (NOTA) पेक्षा वाईट आहे.

पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाले आहे. (हेही वाचा: बिहार निवडणूक निकालावर संंजय राऊत यांची प्रतिक्रिया- 'नीतीश कुमार मुख्यमंत्री झालात तर शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत'; तेजस्वी मॅन ऑफ द मॅच)

पहिला टप्पा -

पालीगंज  - मनीष कुमार - 107 मते

गया शहर - ब्युटी सिन्हा - 145 मते

वजीरगंज - मृत्युंजय कुमार – 68 मते

दुसरा टप्पा -

चिरैय्या - संजय कुमार - 305 मते

बेनीपूर - संजय कुमार झा – 754 मते

तरैय्या - रंजय कुमार सिंह – 378 मते

अस्थवां - विनिता कुमारी – 108 मते

मनेर - रवींद्र कुमार - 141 मते

राघोपुर - जयमाला देवी – 122 मते

भोरे - विनोद बैठा - 696 मते

मधुबनी - शंकर महसेठ - 322 मते

तिसरा टप्पा -

औराई - प्रदीप कुमार सिंह – 331 मते

कल्याणपुर - शत्रूघन पासवान – 1031 मते

बनमंखी - सुभाषचंद्र पासवान 131 मते

ठाकूरगंज - नवीन कुमार मल्लीक -  707 मते

समस्तीपुर - कुंदन कुमार – 46 मते

पुष्पांकुमारी - सराय रंजन – 269 मते

मोरवा - मनीष कुमार - 210 मते

किशनगंज - शिवनाथ मल्लीक - 201 मते

बहादुरगंज - चंदन कु. यादव – 1166 मते

नरपरगंज - गुंजा देवी – 125 मते

मनिहारी - नागेंद्र चंद्र मंडल – 496 मते

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि एनडीएने चांगली आघाडी घेतली आहे. सध्या आरजेडीच्या नेतृत्वात महायुती 105 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत एनडीए पुढे जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now