Bharat Ratna Award Announced to LK Advani: लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा एक्स हँडलद्वारे केली.
लालकृष्ण अडवणी (LK Advani) यांना 'भारतरत्न' (Bharat Ratna Award) पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा एक्स हँडलद्वारे केली. लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. अखंड हिंदुस्तानची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर आडवाणी कुटुंबीय भारतात आले. त्यानंतर आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुढे भारतीय जनता पक्षासोबत राजकीय कार्यक्रमांना जोडून घेतले.
रामजन्मभूमी आंदोलनात काढलेली रथयात्रा देशभर गाजली
लालकृष्ण आडवाणी भारती राजकारणात त्यांची प्रदीर्घ वाटचाल राहिली आहे. खास करुन रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी काढलेली रथयात्रा देशभर गाजली. ज्याचे पर्यावसन पुढे बाबरी मशीद पाडण्यात झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधानदेखील राहिलीले आहेत. भाजपकडून प्रदीर्घ काळ ते पंतप्रधान पदाचेही दावेदार राहिले. मात्र, लोकसभा निवडणूक 2004, 2009 मध्ये भाजपला सलग अपयश आले आणि लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नरेंद्र मोदी नावाच्या चेहऱ्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाच्या दावेदारावरुन बाजूला व्हावे लागले. (हेही वाचा, Ram Mandir Bhumi Pujan: लालकृष्ण आडवाणी यांची राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत भावनिक प्रतिक्रिया म्हणाले)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याचे एक्स हँडलवरुन सांगताना पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लालकृष्ण आडवाणी यांचे जीवन म्हणजे अनेक दशके चाललेली पारदर्शकत सेवा आणि सचोटीच्या अटल वचनबद्धता आहे. जी प्रामानिकपणाने चिन्हांकीत करण्यात आली आहे. त्यांनी भारतीय राजकारणामध्ये नैतिकतेचे एक अनुकरणीय मानक स्थापित केले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा बहुमान मानेन. (हेही वाचा, Karpoori Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर; आज 100 वी जयंती!)
एक्स पोस्ट
पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे की, लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेल्या या व्यक्तीमत्वाचे भारताच्या विकासात योगदान अतुलनीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन महान आहे. त्यांनी देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत, देशाला त्यांच्या कार्याने मार्गदर्शन लाभेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.