COVID-19 Vaccine Update: भारत बायोटेक ची COVAXIN कोरोना व्हायरसच्या Beta आणि Delta व्हेरिएंटवर प्रभावी; अभ्यासातून खुलासा
भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) डेल्टा (Delta) (B.1.617.2) आणि बिटा (Beta) (B.1.351) वेरिएंट्सवर देखील प्रभावी ठरत असल्याचा खुलासा अभ्यासातून झाला आहे.
भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) डेल्टा (Delta) (B.1.617.2) आणि बिटा (Beta) (B.1.351) वेरिएंट्सवर देखील प्रभावी ठरत असल्याचा खुलासा अभ्यासातून झाला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (Indian Council of Medical Research) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्ही (National Institute of Virology) मधील शास्त्रज्ञांनी यासंबंधित अभ्यास केला आहे. कोविड-19 डेल्टा वेरिएंट प्रथम भारतात आढळून आले असून बिटा वेरिएंट साऊथ आफ्रिकेत (South Africa) सापडले होते.
अभ्यासातून समोर आलेली ही माहिती अद्याप कोठेही प्रिंट करण्यात आलेली नाही. तसंच याचे पुनरावलोकन झालेले नाही. हा अभ्यास काही नमुन्यांच्या आधारावर करण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 20 लोकांच्या नमुन्यावरुन आणि कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी 17 लोकांचे सॅपल्स घेऊन अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून कोवॅक्सिन कोविड-19 च्या दोन्ही वेरिएंटविरुद्ध सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.
कोवॅक्सिन घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये बिटा आणि डेल्टा वेरिएंट्स विरुद्ध न्यूट्रिलायझेशनच्या पातळीमध्ये कमतरता दिसून आली आहे, अशी माहिती आयसीएमआर-एनआयव्हीच्या maximum containment facility चे ग्रुप लीडर आणि शास्त्रज्ञ ई डॉ. प्रग्या यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. (Haffkine Biopharma, भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत Covaxin लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करणार)
कोवॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशिल्डला DCGI कडून आपात्कालीन वापरासाठी जानेवारी 2021 मध्ये मंजूरी मिळाली आहे. दरम्यान, कोवॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड घेतलेल्या व्यक्तींमध्ये सेरोपोझिटिव्हिटी रेट आणि मेडियन अँटी-स्पाइक अँटीबॉडी चे प्रमाण अधिक असल्याचे MedRxiv मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल 'Antibody Response of ChAdOx1-nCOV (CovishieldTM) and BBV-152 (CovaxinTM) among Health Care Workers in India' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.