Bharat Biotech, Serum Institute of India कडून COVID-19 ला रोखण्यासाठी Intranasal Vaccines ची निर्मिती; जाणून लसीच्या या प्रकाराबद्दल आणि त्याच्या अपडेट्स विषयी!
यामध्ये अमेरिकन कंपनी Codagenix च्या मदतीने ती बनवली जात आहे.
भारतासह जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लस उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामध्ये आता देशात Bharat Biotech आणि Serum Institute of India (SII) यांच्याकडून इन्ट्रानेसल व्हॅक्सिन (Intranasal Vaccines) विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याबद्दल काल (18 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दुजोरा दिला आहे. सोबतच यामध्ये ट्रायल्ससाठी Washington University आणि St. Louis University कडून मदत घेतली जाणार आहे. COVID-19 Vaccine Update: जुलै 2021 पर्यंत 400-500 मिलीयन लसीचे डोस सुमारे 25 कोटी लोकांना पुरवण्याचे लक्ष्य- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन.
भारत बायोटेककडून विकसित करण्यात आलेल्या Intranasal Vaccines च्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या St. Louis University मध्ये होणार आहेत. भविष्यात परवानगी मिळाल्यानंतर त्यांच्या चाचण्या भारतामध्येदेखील सुरू होऊ शकतात. अंतिम टप्प्यामध्ये हजारो लोकांचा समावेश केला जाणार आहे.
Intranasal Vaccines म्हणजे काय?
लस ही वेगवेगळ्या प्रकरची असू शकते. काही इंजेक्शनच्या स्वरूपात दिल्या जातात. लहान मुलांना तोंडावाटे लस दिली जाऊ शकते. तर Intranasal Vaccines म्हणजे नाकपुड्यांमधून स्प्रे च्या माध्यमातून दिली जाणारी लस. Intranasal Vaccines मुळे सीरिन, सुई, अल्कोहल बेस्ड स्वॅब यांना टाळता येऊ शकतं.
CDX-005 ही सीरम इन्स्टिट्युटची Intranasal Vaccines आहे. यामध्ये अमेरिकन कंपनी Codagenix च्या मदतीने ती बनवली जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचण्या युके मध्ये होणार आहेत. प्राण्यांवरील प्री -क्लिनिकल चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. attenuated म्हणजेच कमी प्रभावशाली असलेल्या व्हायरसचा वापर करून ही लस बनवण्यात आली आहे. त्याचा एक डोस दिला जाणार आहे.
भारतामध्ये भारत बायोटेक आणि आयसीएमआर, झायडलस कॅडिला, सीरम इंस्टिट्युट कडून इंंजेक्शनच्या स्वरूपात दिल्या जाणार्या लसीच्यादेखील मानवी चाचण्या महत्त्वाच्या टप्प्यात आल्या आहेत. सीरमच्या माहितीनुसार वर्ष अखेरीला इंजेक्शन स्वरूपातील लस उपलब्ध होऊन ती बाजारात मार्च 2021 पर्यंत येऊ शकते. तर डॉ. हर्षवर्धन यांनी वर्तवलेल्या विश्वासानुसार वर्षअखेरीपर्यंत भारताकडे 1 पेक्षा अधिक लसी उपलब्ध असतील.