Bharat Bandh on May 25: देशात 25 मे रोजी भारत बंदची हाक; जाणून घ्या जातनिहाय जनगणना, खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणासह काय आहेत मागण्या
त्यांना बहुजन क्रांती मोर्चाचाही पाठिंबा मिळाला आहे.
ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन (BAMCEF) ने 25 मे (बुधवार) रोजी भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. केंद्र सरकारने इतर मागास जातींची जात आधारित जनगणना करण्यास नकार दिल्याने भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे (बीएमपी) सहारनपूर जिल्हाध्यक्ष नीरज धीमान यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय नीरज यांनी इतरही अनेक मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनियमितता, खासगी क्षेत्रात एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी न करणे यासह अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.
या भारत बंदसाठी बहुजन मुक्ती पार्टी आणि ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉइज फेडरेशन एकत्र आले आहेत. त्यांना बहुजन क्रांती मोर्चाचाही पाठिंबा मिळाला आहे.
8 मागण्या, ज्यांच्यासाठी भारत बंद पुकारला आहे-
- केंद्र सरकारने आजपर्यंत जातीच्या आधारे ओबीसी जनगणना का केली नाही?
- निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. ईव्हीएमचा वापर थांबवावा.
- एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण खासगी क्षेत्रातही लागू झाले पाहिजे.
- NRC/CAA/NPR विरुद्ध आवाज उठवणे.
- जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी.
- शेतकऱ्यांना एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करण्यात यावा.
- लोकांना लस घेण्याची सक्ती करू नये.
- पर्यावरण रक्षणाच्या बहाण्याने आदिवासींचे विस्थापन करू नये. (हेही वाचा: आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कर्नाटकच्या म्हैसूर मध्ये होणार साजरा)
25 मे रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदचा जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. यावेळी, दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने देशातील विविध शहरांतील लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भारत बंदशी संबंधित या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना 25 मे रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले आहे. यापूर्वी 22 मार्च आणि 18 एप्रिल रोजी अशीच दोन निदर्शने करण्यात आली होती.