Bharat Atta And Rice At Railway Stations: आता रेल्वे स्टेशनवर मिळणार स्वस्त दरातील भारत आटा आणि तांदूळ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 505 स्थानकांवर सुविधा सुरु

याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना नियमित सुरू करण्यात येईल. मोबाईल व्हॅनद्वारे स्टेशन परिसरात पीठ आणि तांदूळ विक्री केली जाईल. मोबाईल व्हॅनद्वारे विकले जाणारे पीठ आणि तांदूळ या दोन्हींच्या किमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत.

Rice | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bharat Atta And Rice At Railway Stations: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत. गरीब लोकांना मदत करणे आणि देशाचा विकास करणे हा या योजनांचा उद्देश आहे. केंद्राने सर्वसामान्यांना स्वस्त दरात ‘भारत आटा’ म्हणजेच गव्हाचे पीठ (Bharat Atta) आणि भारत तांदूळ (Bharat Rice) पुरवण्याची योजना आणण्याची घोषणा केली होती. आता रेल्वे स्टेशनवर तुम्हाला हे गव्हाचे पीठ आणि तांदूळ स्वस्त दरात मिळणार आहेत. रेल्वेने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टेशनवरही भारत आटा आणि तांदूळ मिळेल. अनेक माध्यमांनी याबाबत अहवाल दिले आहेत.

ईशान्य रेल्वेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे रेल्वे स्थानकाजवळ राहणारे लोक, विक्रेते आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. अशाप्रकारे यापुढे स्टेशन परिसरातच रेशनची विक्री होणार आहे. सध्या ही योजना केवळ प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ही यंत्रणा सुरू आहे. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना नियमित सुरू करण्यात येईल. मोबाईल व्हॅनद्वारे स्टेशन परिसरात पीठ आणि तांदूळ विक्री केली जाईल. मोबाईल व्हॅनद्वारे विकले जाणारे पीठ आणि तांदूळ या दोन्हींच्या किमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्हाला भारत ब्रँडचे पीठ 27.50 रुपये प्रति किलो दराने मिळेल, त्याचवेळी तांदळाची किंमत 29 रुपये प्रति किलो असेल. (हेही वाचा: Ice-Cream With Semen and Urine: किळसवाणे! आईस्क्रीम विक्रेत्याने हस्तमैथुन करून ग्राहकाच्या फालुदामध्ये मिसळले वीर्य व मूत्र; तेलंगणामधील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल)

सध्या ही सुविधा रेल्वेने 505 स्थानकांवर सुरू केली आहे. लखनौ, गोरखपूर, छपरा आणि बनारससह अनेक स्थानकांची नावे त्यात समाविष्ट आहेत. दरम्यान, केंद्र सरकारद्वारे पुरवला जाणारा ‘भारत तांदूळ’ 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध असेल. सरकारकडून तांदूळ आणि ‘भारत आटा’सोबतच ‘भारत चना’ 60 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.