Best Chief Minister: छत्तीसगडचे CM Bhupesh Baghel ठरले देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री- IANS-CVoter Survey
त्यांना मतदारांच्या कमीत कमी रोषाचा सामना करावा लागला आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) हे देशातील सर्वोत्तम कामगिरी (India's Best Performing Chief Minister) करणारे आणि सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उदयास आले आहेत. त्यांना मतदारांच्या कमीत कमी रोषाचा सामना करावा लागला आहे. बघेल यांना देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रियतेचे मानांकन मिळाले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी चिंताजनक बातमी आहे. योगीजी काही महिन्यांनी निवडणुकीला सामोरे जात आहेत, मात्र सर्वेक्षणानुसार, राज्यातील एक तृतीयांश लोक योगी सरकारवर नाराज आहेत.
आयएएनएस-सीव्होटर गव्हर्नन्स इंडेक्सच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या आकडेवारीनुसार, केवळ 6 टक्के उत्तरदाते बघेल यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांना बदल हवा आहे. छत्तीसगडच्या बाबतीत, मतदारांचा राग केंद्र सरकार आणि अगदी राज्यातील आमदारांविरोधात आहे, परंतु बघेल यांच्याबद्दल क्वचितच राग दिसून आला आहे. छत्तीसगडमध्ये, 44.7% मतदार केंद्र सरकारवर नाराज आहेत.
भूपेश बघेल यांनी छत्तीसगडमध्ये अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या शालेय वयाच्या मुलांना मोफत शिक्षण देणे समाविष्ट आहे. छत्तीसगड सरकारने शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण निवडणुकीच्या अगदी आधी झालेल्या या सर्वेक्षणात 28.1 टक्के राग त्याच्या विरोधात दिसून येत आहे. राज्यातील सुमारे एक तृतीयांश लोक त्याच्यावर नाराज आहेत.
त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी 10.1 मतदारांच्या रागासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या व्यतिरिक्त, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक स्वतःच्या विरोधातील 10.4 टक्के आणि राज्य सरकारच्या विरोधातील 37.6 टक्के रागासह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा: काय सांगता? भाजप मंत्री Brajendra Pratap Singh यांचा हरवलेला चष्मा चक्क महिला उमेदवाराच्या केसात; Congress ने चढवला हल्ला)
राज्य सरकारविरोधात सर्वाधिक राग आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये आहे. केंद्राविरोधात सर्वाधिक संताप केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीर, केरळ आणि पंजाबमध्ये आहे. याशिवाय केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात सर्वात कमी राग दिसून आला आहे. सीव्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख म्हणाले की, केंद्र आणि राज्यांच्या कामावर लक्ष दिले आहे.