बंगळुरू विमानतळावर 5 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; खोट्या लग्नाच्या पत्रिकांमधून केली जात होती तस्करी (Watch Video)
या अमली पदार्थांची किंमत 5 कोटी रुपये इतकी असल्याचे समजतेय
बंगळुरू कॅम्प गौडा (Bengaluru's Kempegowda International Airport ) आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) येथील एअर कार्गो कॉम्प्लेक्सच्या कुरिअर टर्मिनस मधील कस्टम अधिका-यांनी शनिवारी लग्नाच्या 43 आमंत्रण पत्रिकेत लपवून ठेवलेले 5 किलो एफेड्रिन औषध (Edrophine Drug) नामक अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची किंमत 5 कोटी रुपये इतकी असल्याचे समजतेय. तासकारी करताना कोणालाही संशय येऊ नये या हेतूने लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेत तब्बल 86 पाउचमध्ये हे अमली पदार्थ लपवण्यात आले होते. मदुराई (Madurai) मधील निर्यातदाराद्वारे हे प्रतिबंधित पदार्थ ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये तस्करी केले जात होते. ATS ची पुण्यात मोठी कारवाई; अंमली पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी उध्वस्त, 5.4 कोटींचा कच्चा माल हस्तगत
या संदर्भात कस्टम विभागाचे सहआयुक्त एम.जे. चेतन यांनी दिलेल्या माहितीनुसार “कुरिअर टर्मिनसवर निर्यातीच्या वस्तूंच्या पडताळणीदरम्यान, सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, एअर कार्गो कॉम्प्लेक्सच्या अधिकाऱ्यांना ही लपवलेली पावडर सापडली. या पॅकेजमध्ये लग्नाच्या 43 आमंत्रण पत्रिका आणि काही कपडे होते. अधिकाऱ्यांना याबाबत संशय येताच त्यांनी पडताळणी सुरु केली या तपासणीत हे ड्रग्ज पेडलिंग मधील रॅकेट असल्याचे उघड झाले.
पहा या कारवाईचा व्हिडीओ
दरम्यान, व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत असल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी सुरुवातीला लग्नाच्या या विचित्र पत्रिका उघडून पाहण्यास सुरुवात केली . या लार्डबोर्डच्या पत्रिकांमध्ये पॉलिथीन पाउच मध्ये स्फटिका सारखे पावडर आढळले एफेड्रिन हे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत प्रतिबंधित पदार्थ आहे.