कन्हैया कुमार याचा समर्थक कॉम्रेड फागो तंती याची निर्घृण हत्या; दोषींना शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही- कन्हैया कुमार

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बेगुसराय मतदारसंघातील उमेदवार कन्हैया कुमार याला पाठिंबा देणं एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतलं आहे, काही अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात फागो तंती यांचा अंत झाला आहे.

(Photo Credits: Instagram/ Kanhaiya Kumar)

जेएनयू (JNU) च्या विद्यार्थी संघटनेचा माजी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI)  समर्थनावर लोकसभा निवडणूक (Loksabha Election Candidate) लढवणाऱ्या कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) ला पाठिंबा देणं बेगुसराय (Begusrai) मधील एका सीपीआयच्या (Communist Party Of India) कार्यकर्त्याच्या जीवावर बेतलं आहे. मागील आठवड्यात कन्हैया व कम्युनिस्ट पार्टीचे समर्थन करणाऱ्या 60 वर्षीय 'फागो तंती' (Fago Tanti) या कार्यकर्त्याचे अपहरण करून हत्या केल्याचे वृत्त समोर आल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉम्रेड फागो हा निवडणुकीच्या काळात कन्हैय्याच्या सभांना व प्रचारासाठी काम करत असल्याचे सांगण्यात येतेय.

मतीहान पोलीस चौकीच्या हद्दीत गुरुवारी रात्री फागो याचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सापडले यावरून ही हत्या अतिशय क्रूरपणे केली गेली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यावेळी त्याचे श्वास सुरु असल्याने त्याला तातडीने जवळच्या बेगुसराय सरदार हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तिथे पोहचतच त्याने आपला प्राण सोडला. या घटनेबाबत पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हॉलला झाला त्यादिवशी फागो ने लाल रंगाचे टीशर्ट घातले होते ज्यावर कन्हैया कुमार आणि कम्युनिस्ट पार्टीचे ब्रीदवाक्य म्ह्णून ओळखले जाणारे घोषवाक्य "हम ले कर रहेंगे आझादी" असे लिहिले होते.

दरम्यान, कन्हैया कुमार याने देखील आपल्या ट्विटर अकाउंट वरून या घटनेचा निषेध करत "जोपर्यंत फागो यांच्या हत्यार्यांना शिक्षा मिळत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही" असे म्हणत त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. बेगुसराय लोकसभा मतदारसंघ: गिरिराज सिंह यांना कन्हैया कुमार यांचे आव्हान, सत्ता विरुद्ध युवानेता थेट संघर्ष

 

कन्हैया कुमार ट्विट 

बेगुसराय येथील स्थानिक माजी आमदार अवधेश राय यांनी देखील फागो यांची हत्या ही राजकारणासाठी कलंक आहे, राजकीय वादाचे असे रूपांतर होणे अत्यंत गैर आहे असे म्हंटले आहे तर फागो यांच्या भावाने घटनेसाठी पोलिसांना जबाबदार ठरवत त्यांच्या दुर्लक्षामुळे आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपस करत असून खुनींच्या बाबत कोणताही पुरावा हाती लागलेला नाही.