Kejriwal ki 5 Guarantee: हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ने लाँच केली 'केजरीवाल की 5 गारंटी'; 'या' गोष्टी देणार फ्री देण्याचे आश्वासन
आम आदमी पार्टी (AAP) ने आज राज्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून हरियाणासाठी 'केजरीवाल की 5 गारंटी' लाँच केले.
आम आदमी पार्टी (AAP) ने आज राज्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून हरियाणासाठी 'केजरीवाल की 5 गारंटी' लाँच केले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह, संदीप पाठक आणि सुशील गुप्ता यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, हा मुलगा (अरविंद केजरीवाल) देशाच्या राजधानीवर राज्य करेल याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. (हेही वाचा - Uddhav Thackeray on Dharavi Slum Redevelopment Project: सत्तेत आल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन)
“ही छोटी गोष्ट नाही, चमत्कारापेक्षा कमी नाही. मला वाटते की त्यांने काही तरी करावे अशी देवाची इच्छा आहे. अरविंद जींनी शून्यातून सुरुवात केली, स्वतःचा पक्ष काढला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
पाहा पोस्ट -
अरविंद केजरीवाल यांचे हरियाणाला 5 आश्वासन
- हरियाणाला मोफत आणि 24 तास वीज
- सर्वांसाठी उत्तम आणि मोफत उपचार
- सरकारी शाळांमध्ये उत्तम आणि मोफत शिक्षण
- सर्व माता भगिनींना दरमहा ₹ 1000 ची मानधन रक्कम.
- प्रत्येक बेरोजगार तरुणांना रोजगाराची व्यवस्था केली जाईल
दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच हरियाणातही वीज कपात बंद करण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे. 'आप'ची सत्ता आल्यास प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक भागात मोहल्ला क्लिनिक बांधले जातील. सर्व शासकीय रुग्णालयांचे नूतनीकरण करून नवीन शासकीय रुग्णालये बांधली जातील. सर्व चाचण्या, औषधे, शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत असतील. उत्तम, उत्कृष्ट आणि मोफत शिक्षणाची हमी दिली जात आहे. दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच हरियाणामधूनही शिक्षण माफियांचा नायनाट केला जाईल. प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची व्यवस्था केली जाईल. दिल्लीत 2.5 लाख सरकारी नोकऱ्या आणि 12 लाखांहून अधिक लोकांसाठी खासगी नोकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.