Suryanagari Express Derail: वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेस ट्रेनचे 8 डबे रुळावरुन घसरले, कोणतीही जीवित हानी नाही

ट्रेनचे आठ डबे रुळवरुन घसरले आहेत. घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

Suryanagari Express Train Derail | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबईतील वांद्रे टर्मिनस ( Bandra Terminus) ते जोधपूर (Jodhpur) प्रवास करणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेस ट्रेनला अपघात (Suryanagari Express Derailed) झाला आहे. ट्रेनचे आठ डबे रुळवरुन घसरले आहेत. घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना राजस्थान (Rajasthan) राज्यातील पाली (Pali) येथे जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा (Rajkiawas-Bomadra Section) स्टेशनदरम्यान पहाटे 3.27 वाजता घडली. वांद्रेहून निघालेली ही ट्रेन जोधपूरला निघाली होती.

उत्तर पश्चिम रेल्वेच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या घटने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रेल्वेचे डबे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने एक मदत आणि बचाव कार्यासाठी आणि अपघातावेळी आवश्यक यंत्रणांनी युक्त अशी कार्यन्वित असलेली गाडी घटनास्थळी पाठवून दिली. (हेही वाचा, Rail Accident: गाझियाबाद मध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात प्रवासी पडला प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये; एएसआई ने वाचवले प्राण (Watch Video))

ट्विट

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचण्यार आहेत. दरम्यान, उत्तर पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकारी जयपूर येथील मुख्यालयातील नियंत्रण कक्षात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती रेल्वेच्या मुख्य संपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.