IPL Auction 2025 Live

Ban NaMo App: चीनी अॅप प्रमाणे नमो अॅपवरही बंदी घाला; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

या कंपन्या या अॅपच्या माध्यमातून चीनला भारतीय नागरिकांची व्यक्तिगत माहिती आणि इतर गोष्टी चीनला पाठवत होत्या असं आढळून आल्यावर सरकारने ही कारवाई केल्याचे समजते.

Prithviraj Chavan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशातील नागरिकांच्या सुरक्षीततेचे कारण देत तब्बल 59 चायनीज मोबाईल अॅपवर (Chinese Mobile App) केंद्र सरकारने ताबडतोब बंदी घातली. या धोरणाचाच वापर करत केंद्र सरकारने नमो अॅप (Namo App) वरही बंदी घाला अशी मागणी माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. 130 कोटी भारतीय नागरिकांची खासगी माहिती धोक्यात आहे. त्यामुळे चीनी अॅपपवर सरकारने बंदी घातली. असाच निकष लावत सरकारने वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणाऱ्या नमो अॅपवरही सरकारने बंदी घालावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एक ट्विट करत नमो अॅपवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करत असताना त्यांनी #BanNaMoApp हा हॅशटॅगही वापरला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ' सरकारने ज्या प्रकारे चीनी कंपन्यांच्या 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे.त्याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅप बंद केले पाहिजे'. (हेही वाचा, India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी)

केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 (A) अन्वये कारवाई करत चीनी कंपन्यांच्या 59 मोबाईल अॅपवर कारवाई केली. या कंपन्या या अॅपच्या माध्यमातून चीनला भारतीय नागरिकांची व्यक्तिगत माहिती आणि इतर गोष्टी चीनला पाठवत होत्या असं आढळून आल्यावर सरकारने ही कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, देशातील डीजिटल क्षेत्रावर चीनकडून सायबर अॅटॅक होण्याची भीती काही दिवसांपूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच सरकारने हा निर्णय घेतला आहे.