Bajaj Finance

मोठे खर्च हे कधीही पूर्वसूचना देऊन उदभवत नाहीत. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, घराची दुरुस्ती, उच्च शिक्षण शुल्क किंवा अगदी पूर्व-नियोजित कौटुंबिक सहली देखील तुमच्या बचतीवर अचानक ताण आणू शकतात. अशा वेळी, पर्सनल लोन हा एक विश्वासार्ह आर्थिक आधार ठरतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक अंदाजपत्रक म्हणजेच बजेटला हात न लावता खर्च सुरळीतपणे व्यवस्थापित करण्यात मदत होते.

सारख्या कर्ज पुरवठादारांसह, पर्सनल लोनची रचना साधी, पारदर्शक आणि लवचिक अशी केली जाते- ज्यामुळे ते नियोजित आणि अनियोजित अशा दोन्ही खर्चांसाठी योग्य ठरतात.

पर्सनल लोन म्हणजे काय आणि ते आवश्यक कशासाठी

पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज असून कर्जाऊ रक्कम मिळविण्यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची किंवा हमीदाराची गरज नसते.

कोणत्याही प्रकारची हमी समाविष्ट नसल्यामुळे, कर्ज पुरवठादार हे तुमची उत्पन्न स्थिरता, परतफेड क्षमता आणि क्रेडिट प्रोफाइलवर लक्ष केंद्रित करतात. बजाज फायनान्स स्पष्ट अटी, लवचिक कार्यकाळ आणि थेट डिजिटल अर्ज प्रक्रियेसह पर्सनल लोन मिळवून देते. ज्यामुळे आजच्या वेगवान जीवनशैलीसाठी कर्ज घेणे अधिक सोयीचे होते.

पर्सनल लोन अर्थपूर्ण कधी वाटते?

जेव्हा तुम्हाला तातडीने निधीची गरज असते आणि अंदाज लावता येण्याजोग्या मासिक परतफेडीस प्राधान्य दिले जाते, तेव्हा पर्सनल लोन अर्थपूर्ण ठरते. हे सामान्यतः पुढील कामांसाठी वापरले जातेः

  • त्वरित हातळावे लागणारे वैद्यकीय खर्च
  • विवाह किंवा कुटुंबाशी-संबंधित खर्च
  • घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती
  • प्रवासी योजना किंवा शिक्षणसंबंधी गरजा

तुमच्या दीर्घकालीन बचतीला हात लावण्यापेक्षा पर्सनल लोन खर्चाची विभागणी मासिक हप्त्यात करते.

पात्रता आणि क्रेडिट स्कोअरचे महत्त्व

पर्सनल लोनची पात्रता निश्चित करण्यात तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतो. सुमारे 650 किंवा त्याहून अधिकचा सिबील स्कोअर सामान्यतः अनेक कर्ज पुरवठादारांकडून स्वीकारार्ह मानला जातो. उच्च गुणांकन (स्कोअर) हे जबाबदार पत वर्तन प्रतिबिंबित करते. तसेच तुमची मंजुरी मिळण्याची शक्यता वाढते.

क्रेडिट स्कोअरशिवाय, कर्ज पुरवठादार खालील घटकही तपासतात:

  • तुमचे मासिक उत्पन्न
  • रोजगार किंवा व्यवसाय स्थैर्य
  • विद्यमान कर्ज जबाबदाऱ्या

चांगली क्रेडिट प्रोफाइल आणि स्थिर उत्पन्न राखल्याने तुम्हाला गरज असेल तेव्हा पर्सनल लोन मिळवणे सोपे होते.

कर्ज घेण्यापूर्वी ईएमआय जाणून घेणे

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही दर महिन्याला किती परतफेड कराल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. येथेच पर्सनल लोनचे ईएमआय कॅलक्युलेटर अत्यंत उपयुक्त ठरते.

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर   परवानगी देतो:

  • तुमचा मासिक ईएमआय अंदाज
  • एकूण देय रक्कम
  • एकूण देय व्याज

उदाहरणार्थ, जर तुम्ही 36 महिन्यांच्या कालावधीसाठी रु. 4,00,000 कर्जाऊ घेण्याचे निश्चित केल्यास ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला तुमच्या मासिक वचनबद्धतेचे स्पष्ट चित्र देते. यामुळे तुम्हाला स्वत:च्या अंदाजपत्रकामध्ये आरामात बसणारी परतफेड योजना निवडण्यात मदत होते.

पर्सनल लोनकरिता बजाज फायनान्सची निवड का करावी

बजाज फायनान्स हे नाव ग्राहकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनासाठी आणि अडचणी-मुक्त कर्ज प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही पगारदार असाल किंवा स्व-रोजगार कमवणारे असाल, अर्जाचा प्रवास सुरळीत आणि वेळेचा अपव्यय न करणारा असा तयार करण्यात आला आहे.

  • किमान कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज
  • सुमारे 24 तासांच्या* आत त्वरित मंजुरी आणि जलद वितरण
  • लवचिक परतफेड कालावधी 12 महिने ते 96 महिने

जर तुम्ही कर्ज घेण्याचा विश्वासार्ह पर्याय शोधत असाल, तर तुम्ही बजाज फायनान्सकडून पर्सनल लोन  घेऊ शकता आणि स्वत:च्या पात्रतेचे सहज मूल्यमापन करणे शक्य आहे.

जबाबदार पद्धतीने पर्सनल लोनचा वापर

पर्सनल लोन लवचिकता उपलब्ध करून देतात, शिवाय आर्थिक स्थिरता राखण्यासाठी जबाबदार वापर आवश्यक आहे. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कर्ज घेणे; तसेच परतफेडीचे आगाऊ नियोजन केल्याने तुम्हाला अनावश्यक तणाव टाळण्यास मदत होऊ शकते.

या आहेत काही व्यवहार्य गोष्टी:

  • आपल्या ईएमआयचा आकडा हा आरामदायक ठेवा
  • एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नयेत
  • ईएमआय वेळच्या-वेळी भरून आपला क्रेडिट स्कोअर संरक्षित करावा
  • रक्कम निश्चित करण्यापूर्वी पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरावा

 

वेळेवर परतफेड केल्याने केवळ व्याजाचे ओझे कमी होत नाही तर भविष्यातील आर्थिक गरजांसाठी तुमचे क्रेडिट प्रोफाइल देखील सुधारते.

 

पर्सनल लोन हे कशाप्रकारे दीर्घकालीन नियोजनाला पाठबळ देते

पर्सनल लोन हे केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी नसते. सुज्ञपणे वापरल्यास, तुमची बचत न संपवता मोठ्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याची परवानगी देऊन ते दीर्घकालीन आर्थिक नियोजनास मदत करू शकते.

उदाहरणार्थ, तुमच्या सर्व राखीव निधीचा मोठ्या खर्चासाठी वापर करण्याऐवजी, पर्सनल लोन तुम्हाला हळूहळू रक्कम परत करताना तरलता/रोखप्रवाह (लिक्विडिटी) टिकवून ठेवण्यास मदत करते. भविष्यातील उद्दिष्टांसह घरगुती खर्चांचे व्यवस्थापन करताना ही शिल्लक विशेषतः उपयुक्त ठरते.

मोठे खर्च हाताळताना तणाव बाळगण्याची गरज नाही. पर्सनल लोन हे तुमचे मासिक बजेट नियंत्रणात ठेवून आर्थिक गरजा व्यवस्थापित करण्याचा एक व्यावहारिक आणि लवचिक मार्ग उपलब्ध करून देते. बजाज फायनान्सबरोबर कर्ज पुरवठादारांना एक सोपी प्रक्रिया, पारदर्शक अटी आणि लवचिक परतफेड पर्यायांचा फायदा होतो.

अर्ज करण्यापूर्वी, तुमच्या पात्रतेचे पुनरावलोकन करा, तुमचा सिबील स्कोअर 650 किंवा त्याहून अधिक असल्याची खातरजमा करा आणि परतफेडीचे सुज्ञपणे नियोजन करण्यासाठी पर्सनल लोनच्या ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करा. योग्य दृष्टिकोनासह, आयुष्यातील मोठे खर्च आत्मविश्वासाने हाताळण्यासाठी पर्सनल लोन हे एक विश्वासार्ह साधन असू शकते.

*नियम आणि अटी लागू