Adarsh School Badlapur Sexual Assault Case: 'पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना ?', विजय वडेट्टीवार यांच्या कडून न्यायालयीन चौकशीची मागणी

त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit- X

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे(Akshay Shinde) याने पोलीस अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून आत्मरक्षणात अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. बदलापूरमधील आदर्श शाळेत (Adarsh School) दोन अल्पवयीन मुलींवर अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केले(Badlapur Sexual Assault Case) होते. या घटनेने संपूर्ण राज्यभरात असंतोष पसरला होता. (हेही वाचा: Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू)

अत्याचाराच्या या घटनेला आता वेगळं वळण लागलं आहे. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टवर त्यांचं मत व्यक्त केलं आहे ते म्हणाले की, ‘याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!', असे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

धागेदोरे आरएसएस पर्यंत भाजपच्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचले

त्याशिवाय, आरोपीला पकडण्यात उशीर केला होता. संस्थेतील पदाधिकारी जे आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आरएसएस पर्यंत भाजपच्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचलेले आहे.त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे. गोळी पोलिसांनी झाडली का अशीही चर्चा आहे. पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि वास्तविकता लोकांसमोर याची अशी माझी मागणी आहे.’

या घटनेनं लोकं रस्त्यावर उतरले होते. लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं. रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांनी केली होती.