Ayodhya Ram Mandir Donations: अयोध्येतील राम मंदिरात दान-धर्माचे सर्व विक्रम मोडले; आतापर्यंत प्राप्त झाल्या 55 अब्ज रुपयांच्चेया देणग्या

अयोध्या राम मंदिर ट्रस्टने मंदिराच्या बांधकामाच्या भूमिपूजनानंतर 2021 मध्ये निधी समर्पण मोहीम सुरू केली होती, ज्या अंतर्गत त्यांना 3500 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

Ayodhya Ram Mandir (File Photo)

Ayodhya Ram Mandir Donations: अयोध्या (Ayodhya) शहरातील भव्य मंदिरात प्रभू रामाची (Lord Rama) प्रतिष्ठापना झाल्यापासून, देश आणि जगातील रामभक्तांनी सढळ हाताने दान करायला सुरुवात केली आहे. राम मंदिरामध्ये प्राप्त झालेल्या दानाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रामलल्लाला एवढ्या देणग्या मिळाल्या आहेत की, मंदिर उभारणीसोबतच राम मंदिराची व्यवस्थाही सुरळीतपणे सुरू राहणार आहे. राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या भूमिपूजनानंतर राम लल्लाच्या भक्तांनी सुमारे 5500 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

एवढेच नाही तर भक्तांनी सोने आणि चांदीही दान केली आहे, जे बँकांमध्ये सुरक्षित ठेवले आहे. राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, भगवान रामललाच्या मंदिराचे भूमिपूजन तब्बल 4 वर्षानंतर पूर्ण झाले आहे. या 4 वर्षात रामलल्लाच्या भक्तांनी 5000 कोटी रुपयांहून अधिक दान केले आहे, त्यापैकी जवळपास 3500 कोटी रुपये निधी समर्पण मोहिमेदरम्यान आले आहेत. परदेशातून आतापर्यंत सुमारे 11 कोटी रुपयांच्या देणग्या आल्या आहेत.

अयोध्या राममंदिराबाबत रामभक्तांमध्ये एवढी श्रद्धा निर्माण झाली आहे की, त्यासाठी देशभरातून आणि जगातून पैसा जमा होऊ लागला आहे. अयोध्या राम मंदिर  ट्रस्टने मंदिराच्या बांधकामाच्या भूमिपूजनानंतर 2021 मध्ये निधी समर्पण मोहीम सुरू केली होती, ज्या अंतर्गत त्यांना 3500 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. यामध्ये परदेशात राहणाऱ्या भाविकांनी दिलेल्या देणगीचाही समावेश आहे. सर्वाधिक देणग्या अमेरिका आणि नेपाळमधून आल्या. (हेही वाचा; Wayanad Landslide: वायनाडच्या भूस्खलन ग्रस्तांना धनुषची मोठी मदत; मुख्यमंत्री मदत निधीसाठी २५ लाख रुपयांची देणगी)

दरम्यान, अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आले आणि त्यानंतर 22 जानेवारी 2024 रोजी पीएम मोदींनी भव्य राम मंदिराचे उद्घाटन केले. यानंतर राम मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात आले. आता रामलल्लाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अशा भक्तांकडून दर महिन्याला सरासरी 1 कोटी रुपयांच्या दक्षिणा जमा होत आहेत.