अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 10 जानेवारी दिवशी, नव्या खंडपीठाची होणार निर्मिती

अयोध्या प्रकरणाविषयी पुढील नियमित सुनावणीसाठी 10 जानेवारीला नव्या खंडपीठाबाबत घोषणा होईल

सुप्रीम कोर्ट (Photo Credits: PTI/File Image)

Ayodhya case:  सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) आज बाबरी मस्जिद ( Babri Masjid) आणि राम मंदिर (Ramjanmabhoomi) याविषयी 14 विविध याचिकांवर आज सुनावणी होणार होती. आज या प्रकरणी अंतिम सुनवणी कधी होणार? नव्याने खंडपीठ तयार करण्याबाबत, किती जणांचे खंडपीठ असेल अशा अनेक प्रश्नांना आज उत्तर मिळणार होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी टळली. पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार आहे. आज अवघ्या 60 सेकंदामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

10 जानेवारीपासून सरन्यायाधीश नव्या खंडपीठाबाबत घोषणा होईल. नियमित सुनावणीसाठी नवीन खंडपीठ निर्णय घेणार आहे. रामाच्या जन्मभूमीवरून वाद आहे. मागील 65 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.