Avtar Saini Dies in Cycling Accident: नवी मुंबई मध्ये कॅब च्या धडकेत माजी Intel India Head चा मृत्यू

सैनी मुंबई मध्ये चेंबूर भागात राहतात. इंटेल 386 आणि 486 मायक्रोप्रोसेसरवर त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी कंपनीच्या पेंटियम प्रोसेसरच्या डिझाइनचे नेतृत्व केले आहे.

Avtar Saini With Jayant Murty (Photo Credit: X/ @jayantmurty)

Intel India चे माजी प्रमुख, 'कंट्री हेड’ अवतार सैनी (Avtar Saini) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये सायकल चालवत असताना मागून भरधाव वेगात असलेल्या कॅबचा धक्का लागल्याने सैनी यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना बुधवार (28 फेब्रुवारी) दिवशी 5.50 च्या सुमाराची आहे. सैनी 68 वर्षीय होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्या साथीदारासोबत ते सायकल चालवत होते. नेरूळ च्या पाम बीच रोड वर हा अपघात झाला आहे.

सैनी यांच्या सायकलला गाडीचा मागून धक्का लागला. त्यानंतर गाडीचा चालक तेथून पळ काढण्यच्या तयारी मध्ये होता. सैनींना जखमा झाल्या होत्या. त्यांच्या सअहकार्‍यांनी त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सैनी मुंबई मध्ये चेंबूर भागात राहतात. इंटेल 386 आणि 486 मायक्रोप्रोसेसरवर त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी कंपनीच्या पेंटियम प्रोसेसरच्या डिझाइनचे नेतृत्व केले आहे.

पोलिसांनी कॅब ड्रायव्हरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे, ज्यात 279 (रॅश ड्रायव्हिंग), 337 (मानवी जीव धोक्यात आणण्यासाठी अविचारीपणे किंवा निष्काळजीपणाने कृत्य केल्याने दुखापत करणे) आणि 304-अ (ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो). कोणत्याही व्यक्तीने कोणतीही अविचारी किंवा निष्काळजीपणाचे कृत्य करून ते दोषी मनुष्यवधाचे नाही) आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदी. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती एनआरआय पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement