व्हिडिओ कॉलिंगद्वारे फाशीचे प्रशिक्षण देताना तरुणाचा मृत्यू
प्रियकर आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉलिंगद्वारे फाशी कशी घ्यायचे ह्याचे प्रशिक्षण देत असताना, अचानक गळ्याला फास लागून प्रियकराचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशच्या दतिया गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक प्रियकर आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉलिंगद्वारे फाशी कशी घ्यायचे ह्याचे प्रशिक्षण देत असताना, अचानक गळ्याला फास लागून प्रियकराचा मृत्यू झाला. ह्या युवकाचे नाव हितेश कुशवाहा असे आहे. हा युवक 21 वर्षांचा होता. प्रशिक्षण देत असता त्याचे अचानक त्याचा तोल जाऊन त्याचा गळ्याला फास बसला. व त्याचा जागीच मृत्यू झाला.
फाशी कशी घ्यायची असा व्हिडिओ आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉलिंगद्वारे दाखवण्यासाठी हितेश आपल्या खोलीतील प्लॅस्टिकच्या टाकीवर उभा राहिला. त्यावेळी त्याने गळ्याला ओढणीचा फास सुद्धा घातला होता. ह्या सर्वाचे चित्रीकरण करत असता अचानक त्याचा तोल गेला आणि त्याच्या पायाखालची टाकी बाजूला सरकल्याने त्याचा गळ्याला फास बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी बराच वेळ हितेश खोलीतून बाहेर न आल्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी बाहेरुन दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस त्यांनी खोलीत वाकून पाहिले असता, हितेश मृत अवस्थेत आढळला.
चेंबूर: परीक्षेत मार्क्स कमी मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून हितेशच्या खोलीतून मोबाईल सापडला ज्यात फाशी प्रशिक्षणाचा व्हिडियो पोलिसांच्या हाती लागला आहे.