Atma Nirbhar Bharat Abhiyan: कृषि इन्फ्रास्ट्रक्चर, फूड प्रोसेसिंस, फिशरीज, पशुपालन, हर्बल शेती, ऑपरेशन ग्रीन यांसह अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 11 घोषणांपैकी 8 घोषणा या कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. ज्यातून शेतीपूरक व्यवसाय, मस्य आणि कृषी उद्योगांना चालना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, असेही सीतारमण म्हणाल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत अभियान (Atma Nirbhar Bharat Abhiyan) अंतर्गत जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत माहिती दिली. या पॅकेजबाबतच्या माहितीचा हा आजचा तिसरा आणि अंतिम टप्पा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या पत्रकार परिषदेत 20 लाख कोटींच्या पॅकेजबाबत 11 महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 11 घोषणांपैकी 8 घोषणा या कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. ज्यातून शेतीपूरक व्यवसाय, मस्य आणि कृषी उद्योगांना चालना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल, असेही सीतारमण म्हणाल्या.
अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने खूप महत्त्वाची पावले उचलली. पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 700 कोटी रुपये पोहोचवले.
1) कृषि इन्फ्रास्ट्रक्चर
लॉकडाऊन काळात 5600 लाख लीटर दूध कॉपरेटीव्ह संस्थांनी खरेदी केले. त्यातून दूध उत्पादकांच्या हातात 4100 कोटी रुपयांची रक्कम पोहोचवली.
कृषी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख कोटी रुपये दिले जातील. त्यातून कोल्ड चेन, शेतकमाल काढणे, त्यानंतरच्याही सुविधा मिळतील. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेन.
2) फूड प्रोसेसिंस
मायक्रो फूड एटरप्रायजेससाठी 10000 कोटी रुपयांच्या फंडाची योजना आहे. ही क्लस्टर बेस्ड योजना असेन. यातून 2 लाख खाद्य यूनिट्सना लाभ मिळेल. रोजगारातही वाढ होईल. (हेही वाचा, Atma Nirbhar Bharat Abhiyan: कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपये देणार केंद्र सरकार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण)
3) फिशरीज
मत्स संपदा योजनेबाबतची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ती आता लागू करत आहोत. यातून 50 लाख लोकांना रोजगार मिळेल. भारताची निर्यात वाढेन. मत्स पालन वाढविण्यासाठी मच्छिमारांच्या नावाने आणि नावेसाठी विमा देण्यात येईल. समुद्री आणि आंतरराष्ट्रीय मत्सपालनासाठी 11 हजार कोटी रुपये आणि 9 हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी दिले जातील.
4) पशुपालन
केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, काही पाळीव प्राण्यांना द्यावी लागणारी लस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. म्हणूनच सर्व गायी-म्हशी, शेळ्या मेंड्या आदींसाठी लसटोचणी केली जाईल. त्यासाठी आवश्यक वॅक्सिनेशनसाठी 13 हजार 343 कोटी रुपये खर्च होतील. त्यातून 53 पाळीव पशुंना आजारातून मुक्तता मिळेल. जानेवारीपर्यंत 1.5 कोटी गाय आणि म्हशींना वॅक्सिन देण्यात आले आहे. पशुपालन इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांचा फंड दिला जाईल.
5) हर्बल शेती
हर्बल शेतीसाठी केंद्र सरकारने 4 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढच्या दोन वर्षांत 10 लाख हेटक्टर जमीनीवर हर्बल शेतीर केली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना 5 हजार कोटी रुपयांचे उत्पादन तयार होईल. हर्बल प्लांटची मागणी जगभरातून वाढत आहे. कोविड 19 च्या संकट काळात हर्बल प्लांट आमच्या विशेष मदतीला आले.
Nirmala Sitharaman: शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज; अजून बऱ्याच योजनांचा समावेश - Watch Video
6) मधमाशी पालन
सुमारे 2 लाख मधमाशा पालकांसाठी 500 कोटी रुपयांची योजना आहे. त्यांचे उत्पन्न वाढेन. तसेच लोकांना चांगले आणि गुणवत्तापूर्ण मध मिळेन.
7) ऑपरेशन ग्रीन
ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून TOP म्हणजेच टोमॅटो, बटाटा, कांदा योजनेत इतर फळभाज्यांनाही आणण्यात आले आहे. TOP योजनेसाठी सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद आहे.
दरम्यान, 50% अनुदान ट्रान्सपोर्टेशनसाठी दिले जाईल. तर शेतमालाच्या साठवणुकीसाठी 50% अनुदान दिले जाईल. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत माहिती देण्यासाठी अर्थमंत्री सीतारमण यानी आज सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सीतारमण यांनी 11 घोषणा केल्या. यातील 8 शेतीशी संबंधित राहिल्या.