Assam-Mizoram Border Violence: महाराष्ट्राचा सुपुत्र SP वैभव निंबाळकर जखमी; बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने दिले हेल्थ अपडेट्स; खासदार सुप्रिया सुळेंची ट्वीट द्वारा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

सध्या ते आयसीयू मध्ये असून लवकरच शस्त्रक्रियेद्वारा गोळी काढली जाईल असं सांगण्यात आले आहे.

Urmila With Brother IPS Vaibhav Nimbalkar | PC: Instagram

ईशान्य भारतामध्ये आसाम आणि मिझोराम (Assam-Mizoram Border Violence) या राज्यांत सीमवादावरून काल (26 जुलै) पुन्हा संघर्ष पेटला आहे. दरम्यान या हिंसाचारामध्ये 6 पोलिस धारातीर्थी पडले आहेत तर 50 पोलिस जखमी आहेत. त्यामध्ये एक महाराष्ट्राचे सुपुत्र IPS वैभव निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) देखील आहेत. वैभव हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसरचे आहेत पण सध्या ते कछार जिल्ह्याचे एसपी आहेत. कालच्या हिंसाचारामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. वैभव यांची बहीण अभिनेत्री, युट्युबर ऊर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हीने इंस्टावर पोस्ट करत माहिती देताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. सध्या ते आयसीयू मध्ये असून लवकरच शस्त्रक्रियेद्वारा गोळी काढली जाईल असं सांगण्यात आले आहे.

दरम्यान वैभव निंबाळकर यांच्या आरोग्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रार्थाना केली आहे. त्याबाबत ट्वीट करत 'तब्येतीला लवकर आराम पडो ही सदिच्छा.लवकर बरे व्हा' असं म्हटलं आहे. वैभव निंबाळकर हे भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडले गेले होते.

खासदार सुप्रिया सुळे ट्वीट

हर्षवर्धन पाटील ट्वीट

उर्मिला निंबाळकर पोस्ट

Urmila Nibalkar Tweet | PC: Instagram

आसाम आणि मिझोराम मध्ये  सीमेवरून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्य भारतातील राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची शिलॉंगमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला 2 दिवस होण्यापूर्वीच पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आणि नागरिक एकमेकांना भिडले आहेत. काल या भागात काही शेतकर्‍यांच्या झोपड्यांना आग देखील लावण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif