Assembly Election Results 2021 Updates: असममध्ये प्राथमिक कल हाती, भाजप आघाडीवर
यात 74 महिलांसह 946 उमेदवारांनी जनमताचा कौल आजमवण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठ वाजल्यापासून 331 मतदान केंद्रांमध्ये मतमोजणी सुरु आहे.
असम विधानसभा निवडणूक मतमोजणीस (Assembly Election Results 2021) सुरवात झाली असून पोस्टल मतांची मतमोजणी संपली आहे. आता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरवात झाली आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येत आहेत. या कलांनुसार भाजप (bjp) आणि मित्रपक्ष 25 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस आणि मित्रपक्ष 18 जागांवर आघडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. असम जातीय परिषद (HJP) तीन जागांवर आघाडीवर आहे. हे कल केवळ पोस्टल मतांच्या मोजणीतून हाती आलेले आहेत. राज्यात एकूण 331 केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत भारपसमोर सत्ता पुन्हा टिकवण्याचे आव्हान आहे. तर काँग्रेससमोर गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्याचे आव्हान आहे. भाजप आणि काँग्रेसने दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. सुरुवातीचे आकडे पाहता भाजपला यशाचे दरवाजे दिसू शकतात असे चित्र आहे. परंतू, हे चित्र अगदीच प्राथमिक आहे. अजून मतमोजणीचा खरा कल हाती आला नाही. एक्झिट पोल्सचे अंदाज पाहिले तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसत असल्यचे चित्र आहे.
असम राज्यात 126 विधानसभा मतदारसंघासाठी 3 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली. यात 74 महिलांसह 946 उमेदवारांनी जनमताचा कौल आजमवण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठ वाजल्यापासून 331 मतदान केंद्रांमध्ये मतमोजणी सुरु आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन करुन मतमोजणी करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. एक्झिट पोल्सनी वर्तवलेल्या अंदाजात असममध्ये भाजप सत्तेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली आहे. (हेही वाचा, Assembly Election Results 2021 Aaj Tak Live Streaming: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, असम, पुडुचेरी विधानसभा निवडणूक निकाल Aaj Tak लाईव्ह स्ट्रिमिंग इथे पाहा)
दरम्यान, सांगितले जात आहे की, कोरोना महामारी निर्बंधांनुसार कोणताीह उमेदवार किंवा त्यांचा एजंट यांना कोरोना व्हायरस चाचणी कारावी लागणार आहे. कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याशिवाय कोणताही उमेदवार अथवा त्यांच्या एजंटला मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना नियमांचे काटेकोर पालण करण्यासाठी कोणताही अनुचीत प्रकार टाळणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.