प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर आसाम येथे बॉम्बस्फोट, तपास सुरु
याचा आनंद एकीकडे साजरा केला जात आहे तर दुसरीकडे आसाम येथे चार बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आज देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. याचा आनंद एकीकडे साजरा केला जात आहे तर दुसरीकडे आसाम येथे चार बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आसाम मधील एका गुरुद्वाराच्या जवळ विस्फोट सापडल्याचे सांगण्यात आले. असे सांगितले जात आहे की, सकाळच्या वेळेस डिब्रूगढ मधील ग्राहम बाजारात NH-37 जवळ एका दुकानात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. तर सोनारी आणि पोलीस स्थानकाजवळ सुद्धा बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आसाम येथील पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, डिब्रुगडच्या येथील बॉम्बस्फोटाबाबत त्यांना कळवण्यात आले. त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहतच या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जात आहे.(आसाम पोलिसांचे मोठे यश; बंदी घातलेल्या 8 संघटनांमधील 644 अतिरेक्यांचे, 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण)
ANI Tweet:
तर 6 दिवसांपूर्वी सुद्धा सोमवारी रात्री 11.50 वाजता आसाम मधील सोनारी येथील समेकाटी येथे विस्फोट झाला होता. मात्र या मध्ये कोणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच स्वातंत्र्यानंतर आसामसह संपूर्ण ईशान्य भागात बंडखोरी ही फार मोठी समस्या आहे. आसाममधील लोकसंख्येच्या 28% लोक 'बोडो' आहेत. हे लोक स्वत: ला आसामचे मूळ रहिवासी मानतात. या लोकांना अरुणाचलला लागून असलेला परिसर बोडोलँड घोषित करायचा आहे. बाहेरील लोक आसाममध्ये आल्यावर, इथल्या लोकांच्या जीवनमान व संस्कृतीवर परिणाम झाला आहे.