Arun Jaitley Health Update: अरुण जेटली यांची प्रकृती अजूनही गंभीर, अरविंद केजरीवाल व मोहन भागवत यांनी घेतली भेट

आज दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल तसेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेटली यांची रुग्णालयात भेट घेतली.

Former Union Minister Arun Jaitley and Delhi CM Arvind Kejriwal. (Image: PTI/File)

माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley)  यांची प्रकृती दिवसेंदिवस आणखीनच चिंताजनक होत आहे. काल त्यांना व्हेंटिलेटर वरून थेट ECMO विभागात नेऊन कृत्रिम पद्धतीने शरीरात ऑक्सिजन पुरवण्यात आला होता. मात्र अद्याप त्यांच्या परिस्थितीत कोणतेही सकारात्मक बदल होत नसल्याचे समजत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून अनेक नेते मंडळी जेटली यांची भेट घेत आहेत, आजही दिल्लीचे मुख्यमंत्री  (Delhi Chief Minister) व आम आदमी पक्षाचे  (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तसेच आरएसएसचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जेटली यांची रुग्णालयात भेट घेतली. यानंतर लगेचच केजरीवाल यांनी जेटली यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत एक ट्विट केले आहे.

अरविंद केजरीवाल ट्विट

9 ऑगस्टच्या सकाळी प्रकृती बिघाडामुळे अरूण जेटलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. आरोग्याच्या तपासणीसाठी फेब्रुवारी मध्ये त्यांनी यूएस मध्येही काही काळ घालवला होता.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी जेटलींची भेट घेतली होती. काल सुद्धा गृहमंत्री अमित शहा यांच्यासह आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे रुग्णालयात उपस्थित होते.