जम्मू-कश्मीर आणि लद्दाख यांच्या रुपात देशाला मिळाले 2 नवे केंद्रशासित प्रदेश, येथे वाचा भारतीय राज्यासह UTs ची पूर्ण माहिती

मोदी सरकारने सोमवारी (5 ऑगस्ट) राज्यसभेत जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) यांची पुर्नरचना होणार असल्याची माहिती दिली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल फोटो)

मोदी सरकारने सोमवारी (5 ऑगस्ट) राज्यसभेत जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) यांची पुर्नरचना होणार असल्याची माहिती दिली. जम्मू कश्मिरमधील आर्टिकल 370 रद्द करण्याची शिफारस करण्याची माहिती आज राज्यसभेत अमित शहा यांनी दिली. या विधेयकानुसार, जम्मू-कश्मीर या राज्यांचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये जम्मू-कश्मीर हे केंद्रशासित प्रदेश असणार असून लद्दाख दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे. शहा यांनी राज्यसभेत असे म्हटले आहे की, केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर येथे विधानसभा कायम राहणार आहे. मात्र लद्दाख येथे विधानसभा कायम राहणार नाही. सीमेच्या बाहेर असणऱ्या दशतवाद्यांच्या धोक्यामुळे हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

जम्मू-कश्मीर यांना दोन राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर त्याचा आकडा 7 वरुन 9 झाला आहे. त्याचसोबत एक राज्य कमी करण्यात आले आहे. तसेच देशातील राज्यांची संख्या 29 वरुन 28 एवढी झाली आहे.(जम्मू-कश्मीर लद्दाख या राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा; महबूबी मुफ्ती, अरुण जेटली आणि आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडले मत)

केंद्रशासित प्रदेश:

-दिल्ली

-दमण आणि दीव

-दादरा आणि नगर हवेली

-अंदमान आणि निकोबार बेटे

-चंदीगढ़

-लक्षद्वीप

-पुदुच्चेरी

-जम्मू-कश्मीर

-लद्दाख

देशातील 28 राज्य:

1. उत्तर प्रदेश

2. उत्तराखंड

3. पश्चिम बंगाल

4. त्रिपुरा

5. तमिलनाडु

6. तेलंगाना

7. पंजाब

8. राजस्थान

9.सिक्किम

10. ओडिशा

11. मणिपुर

12. मिजोरम

13. मेघालय

14. कर्नाटक

15. महाराष्ट्र

16. मध्य प्रदेश

17. केरल

18.नागालैंड

19. झारखंड

20. हिमाचल प्रदेश

21. हरियाणा

22. गुजरात

23. गोवा

24. छत्तीसगढ़

25. बिहार

26. आसाम

27. अरुणाचल प्रदेश

28. आंध्रप्रदेश

मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सोशल मीडियात स्वागत केले जात आहे. तसेच अमित शहा-नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.