देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 3 लाख; रिकव्हरी रेट 58% पेक्षा अधिक- आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन
तर मृत्यू दर सर्वात कमी म्हणजे केवळ 3% आहे. अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
भारतात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान सुरु आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाखांच्या पार गेल्याने साहजिकच चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील चांगली असल्याने देशाचा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. तब्बल 3 लाखाच्या सुमारास रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने देशाचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 58% पेक्षा अधिक आहे. तर मृत्यू दर (Fatality Rate) सर्वात कमी म्हणजे केवळ 3% आहे. अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी दिली आहे. विशेष म्हणजे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग (Doubling Rate) कमी होऊन 19 दिवसांवर आला आहे. लॉकडाऊनपूर्वी रुग्ण दुप्पट होण्यासाठी केवळ 3 दिवसांचा कालावधी लागत होता. अशी माहिती देखील डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. (भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पार! गेल्या 24 तासांत आढळले 18,552 नवे रुग्ण)
देशात एकूण 508953 कोरोना बाधित रुग्ण असून 295881 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर 197387 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान 15685 रुग्णांचा कोविड-19 च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दर दिवशी वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसंच नागरिकांनाही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. (केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडून 'eBloodServices' मोबाईल अॅपचे लॉन्चिंग; त्वरीत रक्तपुरवठा होण्यासाठी ठरणार फायदेशीर)
ANI Tweet:
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 152765 वर पोहचला आहे. दरम्यान जुलै-ऑगस्ट महिन्यात राज्यातील कोविड-19 बाधितांची संख्या वाढू शकते असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. असे असेल तरी मृत्यू दर वाढणार नाही याची खबरदारी सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसंच राज्यातील डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येणार असून ICU बेड्सच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी जनतेला आश्वस्त केले आहे.