Pune Crime: मैत्रीणीवरून दोघांमध्ये वाद पेटला, 15 वर्षाच्या मुलाची हत्या; पुण्यातील खळबळजनक घटना
मैत्रीच्या भांडणात एका शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
Pune Crime: मैत्रीणीच्या भांडणात एका शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. झोपेत असताना 15 वर्षाच्या मुलावर कोयत्याने आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात पीडित मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. (हेही वाचा- सासऱ्याला मारण्यासाठी दिली 3 लाखाची सुपारी, )
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश हरिसिंग रजपूत असं मृत मुलाचे नाव आहे. प्रकाशला मारहाणे दोन हल्लेखोर हे अल्पवयीन असल्याचे समोर येत आहे. ही घटना पुणे शहरातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत ही घटना घडली. मृत मुलगा नववीचे शिक्षण पूर्ण करत होता. शहरातील खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान शाळेत एका मैत्रीच्या वादातून प्रकाश आणि त्यांच्या मित्रामध्ये भांडण झालं होते. मैत्रीण बोलत नसल्याचा राग आरोपीने मनात धरून ठेवला होता.
प्रकाश नेहमी प्रमाणे शाळेतून घरी आला आणि झोपून गेला. झोपल्यानंतर काही वेळानंतर हल्लेखोरांनी प्रकाशवर हल्ला केला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो बाहेर पडला. परंतु त्याला गंभीर जखम झाल्याने तो काही अंतरावर जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पानशेत येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसा या प्रकरणी पुढील तपास करत आहे. या घटनेनंतर पुण्यात एक खळबळ उडाली आहे. मृत मुलाच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.