Anju-Nasrullah Case: पाकिस्तानी मित्राशी लग्न केलेल्या भारतीय महिलेचा देशात पतीला फोन;'मुलांनाही पाक मध्ये नेण्याचा' बोलून दाखवला मानस

अनू यांनी व्हिडीओ कॉल मध्ये तिने Nasrullah सोबत लग्न केल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

A screengrab of the video. (Photo credits: Twitter/@umashankarsingh)

प्रेमासाठी सीमा पार करून गेलेल्या अनु थॉमस (Anju Thomas) या भारतीय स्त्री ने पाकिस्तानी मित्राशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तिने इस्लाम (Islam) धर्म स्वीकारल्याचंही म्हटलं आहे. अनू ने पतीला फोन करून आपल्या मुलांनाही पाकिस्तान मध्ये घेऊन जाणार असल्याचं म्हटलं आहे. अनूच्या वडिलांनी मीडीयाला दिलेल्या माहितीमध्ये, अनूने भारतामधील तिचा पती अरविंद मीना याला फोन करून मुलांना तिच्याकडे देण्यास सांगितलं आहे. अनूचा पती भारतात राजस्थान मध्ये राहतो. अनू त्याला धमकावत असल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. दरम्यान आपल्यासाठी मुलगी मेली असल्याची भावना अनूचे वडील गया प्रसाद यांनी बोलून दाखवली आहे.

मध्य प्रदेश गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ग्वालियर पोलिसांना थॉमस कुटुंबाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तेणापूर मधील बोना गावामध्ये पोलिसांनी अनूच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावले होते. सध्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर पोलिसांची निगराणी आहे. नक्की वाचा: Chinese Woman in Pakistan: प्रेमात सीमा नसतात, अंजू नंतर आता चिनी तरुणीचा पराक्रम; चिनी तरुणींने प्रेमासाठी गाठलं पाकिस्तान .

दरम्यान अनू यांनी व्हिडीओ कॉल मध्ये तिने Nasrullah सोबत लग्न केल्याचं वृत्त फेटाळलं आहे. एसपी चंदेल यांच्या म्हणण्यानुसार अंजूच्या कुटुंबाच्या सर्व कागदपत्रांचा आढावा घेतला जात आहे. अंजू आणि तिच्या कुटुंबीयांच्या कॉल रेकॉर्डचा आढावा घेण्यासह तपासही केला जात आहे. याशिवाय, अंजूच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि इतर ठिकाणं पाहण्यासाठी एक टीम तयार केली जात आहे.