Anil Desai Enquiry: शिवसेना ठाकरे गटाचे नेते गुन्हे शाखा कार्यालयात हजर, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार - अनिल देसाई
त्यामध्ये आता अनिल देसाई यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. अनिल देसाई हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT ) माजी खासदार मुंबई आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई ( Anil Desai) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (Mumbai Police Headquarters) समन्स बजावण्यात आला होता. शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भात शिवसेना शिंदे गटाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी खात्या संदर्भातील चौकशी सुरू केली असून अनिल देसाई यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा जाहीर केल्यानंतर पक्षनिधी खात्यातील 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने करत तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा - Anil Desai चौकशी साठी Mumbai Police Headquarters मध्ये दाखल; पक्ष निधी मधून 50 कोटी काढल्याचा आरोप)
पाहा पोस्ट -
चौकशीला पूर्णपणे सहकार्य करू, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. या चौकशीमुळे कुठल्याही प्रकारचा प्रेशर पक्षावर येणार नाही. हा पार्टी फंड आहे, त्याचा वापर पक्षाच्या कार्यासाठी केला जातो. त्यांना जर या संबंधी चौकशी करायची असेल तर सगळी माहिती आम्ही देऊ. तुम्ही म्हणत आहात आणि जनतेला कळत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आलेले आहेत आणि अनुषंगाने ही कारवाई होती आहे. जी तक्रार दाखल केली आहे, पक्षाच्या निधी संदर्भात आहे आणि त्यावर आम्ही सगळी माहिती देऊ, असं देसाई यांनी सांगितलं आहे.
ठाकरे गटातील किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, राजन साळवी सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडार वर आहेत. त्यामध्ये आता अनिल देसाई यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. अनिल देसाई हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. नुकताच त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपला आहे. आता ते लोकसभेच्या रिंगणातून दिल्लीला जाणार असल्याची देखील चर्चा आहे.