Andhra Pradesh: महिलेची रस्त्यावरच प्रसुती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; तिरुपती येथील घटना

ज्यामध्ये रुग्णालयात दाखल न केल्याने एका गर्भवती महिलेला रस्त्यावर प्रसूती करावी लागली. ही घटना तिरुपती मॅटर्निटी हॉस्पिटल बाहेर घडली. हॉस्पिटलच्या बाहेर, महिलेची प्रसूती रस्त्यावर झाली, तेव्हा अनोळखी लोकांनी तिला मदत आणि तिची देखभाल केली.

Baby | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

आंध्र प्रदेशातील तिरुपती (Tirupati in Andhra Pradesh) येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रुग्णालयात दाखल न केल्याने एका गर्भवती महिलेला रस्त्यावर प्रसूती करावी लागली. ही घटना तिरुपती मॅटर्निटी हॉस्पिटल बाहेर घडली. हॉस्पिटलच्या बाहेर, महिलेची प्रसूती रस्त्यावर झाली, तेव्हा अनोळखी लोकांनी तिला मदत आणि तिची देखभाल केली. ही घटना घडत असताना उपस्थितांपैकीच एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही महिला गर्भवती महिलेला पकडत आहेत. गर्भवती महिला बाळंतकळांनी विव्हळत, ओरडत आणि कन्हत आहे. एक पुरुषहीया सर्वांना मदत करत असताना दिसतो आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, असे सांगण्यात येत आहे की, महिलेला रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी सांगितले होते की तिच्यासोबत कोणीही नसल्याने ते तिला रुग्णालयात दाखल करुन घेऊ शकत नाहीत. मुलाला जन्म देण्यासाठी मदत करणारी व्यक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करते. (हेही वाचा, World's Oldest Babies: 30 वर्षांपूर्वी Frozen केलेल्या Embryos मधून जुळ्यांनी घेतला जन्म (See Pics))

ट्विट

प्रसूती झाल्यानंतर महिला आणि मुलाला नंतर रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, यापुढे कोणत्याही गर्भवती महिलेला परिचर नसताना प्रवेश नाकारला जाणार नाही, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्याचवेळी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तिरुपतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीहरी यांनी सांगितले की, घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल.