Mann Ki Baat: कॅनडातील श्री अन्नपूर्ण देवीची मूर्ती 100 वर्षानंतर पुन्हा भारतात येणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
काशीमधून कॅनडात नेण्यात आलेली श्री अन्नपूर्णा देवीची मूर्ती (Shree Annpurna Devi Statue) ही 100 वर्षानंतर पुन्हा भारतात आणण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा रेडिओ वर 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रम होतो. आज झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. मोदीचा आजचा मन की बात कार्यक्रम 71 वा होता. या कार्यक्रमात त्यांनी देशातील शिल्पाकृतींवर भर देत मंदिर आणि मूर्त्यांविषयी चर्चा केली. विविधतेने नटलेल्या भारतातील शिल्प हे देशाचे खरे वैभव आहे. त्यामुळे याच्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. काशीमधून कॅनडात नेण्यात आलेली श्री अन्नपूर्णा देवीची मूर्ती (Shree Annpurna Devi Statue) ही 100 वर्षानंतर पुन्हा भारतात आणण्यात येणार आहे.
हे सर्व भारतवासियांसाठी आनंदाची आणि गौरवाची बातमी आहे. भारतातील शिल्प स्वदेशी परत यावे यासाठी पंतप्रधान मोदींनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील कलाकृतींचे जतन हे आपल्या देशातच केले पाहिजे आणि त्या अमूल्य गोष्टी स्वदेशीच राहिल्या पाहिजे यासाठी मोदींनी ही महत्त्वाची घोषणा केली. याबाबतीत त्यांनी कॅनडा सरकारचे देखील आभार मानले.हेदेखील वाचा- Maan Ki Baat: मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता
या व्यतिरिक्त बर्ड वॉचिंग आणि निसर्गाची संबंधित अनेक गोष्टींवर पंतप्रधानांनी या कार्यक्रमात प्रकाश टाकला. यात आता तुम्हाला घरबसल्या दिल्लीतील संग्रहालयाचे दर्शन घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती मोदींनी दिली. तसेच काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेल्या वर्ल्ड हेरिटेज सप्ताह साजरा करण्यात आला. यावर भाष्य करत त्यांनी देशातील संस्कृती, परंपरा यावर प्रकाश टाकला.
दरम्यान त्यांनी कोविड-19 लसीबाबत बोलत एक महत्त्वाची माहिती दिली. कोविड-19 ची लस बनविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून लवकरच ही लस भारतात येईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.