घृणास्पद! भररस्त्यात तरूणीसमोर एका अज्ञात इसमाने आपले गुप्तांग दाखवून विनयभंग करण्याचा केला प्रयत्न, अहमदाबाद मधील लाजिरवाणी घटना

अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, भररस्त्यात एका तरुणीसमोर येऊन एका अज्ञात इसमाने आपले गुप्तांग काढून दाखवले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महिलांवर होणारे अत्याचार थांबावे यासाठी कायद्यासह अनेक सामाजिक संघटना जीव तोडून काम करत आहे. मात्र इतके करुनही माणसामधील विकृती काही जाता जात नाही. वासनेपोटी पुरुषांमधील विकृती दिवसेंदिवस अश्लीलतेचा कहरच करू लागली आहे. अशीच एक लज्जास्पद घटना अहमदाबाद (Ahemdabad) येथे घडली आहे. अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, भररस्त्यात एका तरुणीसमोर येऊन एका अज्ञात इसमाने आपले गुप्तांग काढून दाखवले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

हा किळसवाणा प्रकार ऐकून कुणालाही धक्काच बसेल. महिलांवरील अत्याचाराबाबत कायदे इतके कठोर होऊनही असे प्रकार सर्रासपणे होताना दिसत आहे याचीच चीड सर्वात जास्त येते.हेदेखील वाचा-बिहार: बायकोच्या विवाहबाह्य संबंधात नवरा ठरला अडथळा, नाकात-कानात फेविक्विक टाकत अत्यंत क्रूरपणे केली हत्या

 

पाहा नेमकं काय घडलं?

पीडित तरुणी कायद्याचे शिक्षण घेत असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. शुक्रवारी दुपारी ती ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने बाहेर गेली होती. त्याचवेळी दुचाकीवरुन एक तरुण तिथे आला व पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवले. आपल्याला संबंधित ठिकाण कुठे आहे, ते माहित नाही असे तरुणीने त्याला सांगितले. पण तरीही तो तिला सतत माहिती विचारत होता. त्यावेळी अचानक त्याने तुला मासिक पाळी चालू आहे का? अशी विचारणा केली.

इतकंच नाही तर, त्यानंतर त्या विकृत इसमाने तिच्या शरीरावरून टिप्पणी द्यायला सुरुवात केली आणि तिला काही कळायच्या आत त्याने त्याच्या पँटची चैन काढून तिला गुप्तांग दाखवले. हा सर्व प्रकार पाहून तिने जोरात आरडाओरडा केला. त्यावेळी घाबरून त्याने तिथून पळ काढला. असे तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

पीडित तरुणी म्हणाली, 'आपण जे करतोय ते चुकीचे आहे याचा यत्किंचितही पश्चाताप त्या विकृताला होत नव्हता. याउलट सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार जेव्हा घडला तेव्हा रस्त्यावर 4-5 माणसे होती. मात्र त्यातील कोणीही मदतीसाठी आले नाही.' या प्रकरणी पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस त्या अज्ञात इसमाचा शोध घेत आहे.