विषारी हवेशी सामना करण्यासाठी दिल्लीमध्ये सुरु झाला Oxygen Bar; 7 फ्लेव्हर मध्ये विकला जात आहे ऑक्सिजन, जाणून घ्या किंमत
अशा परिस्थितीत बाजारामध्ये आता ‘ऑक्सी प्यूअर’ (Oxy Pure) नावाचा एक ऑक्सिजन कॅफे उघडला गेला आहे. इथे लोकांना ऑक्सिजनचा डोस दिला जात आहे.
देशाची राजधानी दिल्लीला (Delhi) प्रदूषणाचा मोठा विळखा बसला आहे. त्यात प्रदूषणाच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत, विषारी हवेमुळे दिल्लीकर अस्वस्थ आहेत. हे टाळण्यासाठी, लोक मास्क विकत घेत आहेत, घरांमध्ये एअर-क्लीनर वनस्पती लावत आहेत, इतकच नाही तर महाग एअर प्यूरिफायरने देखील, विषारी हवेचा तोटा टाळणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत बाजारामध्ये आता ‘ऑक्सी प्यूअर’ (Oxy Pure) नावाचा एक ऑक्सिजन कॅफे उघडला गेला आहे. इथे लोकांना ऑक्सिजनचा डोस दिला जात आहे. 15 मिनिटांच्या सुगंधी ऑक्सिजनसाठी ग्राहकांना 299 ते 499 रुपये दर आकारण्यात येत आहे.
दिल्लीच्या साकेत येथे हा ऑक्सिजन बार सुरु झाला आहे. 'ऑक्सी प्यूअर' असे त्याचे नाव असून, तो ग्राहकांना सात वेगवेगळ्या सुगंधांमध्ये (लिंबू, संत्रा, दालचिनी, भाला, पेपरमिंट, निलगिरी आणि लॅव्हेंडर) शुद्ध ऑक्सिजन प्रदान करतो. Bonny Irengbam या तरुणाने हा बार सुरु केला आहे. हा बार वातावरणाचा दाब नियंत्रित करतो आणि ग्राहकांना शुद्ध ऑक्सिजन देतो. ग्राहकांना एक ट्यूब दिली जाते ज्याद्वारे ते फ्लेव्हर्ड असलेल्या ऑक्सिजनमध्ये श्वास घेतात. एक माणूस दिवसातून एकदाच अशा प्रकारे ऑक्सिजन घेऊ शकतो. (हेही वाचा: दिल्लीत घातक हवेमुळे हेल्थ इमर्जेंसी लागू, नागरिकांना आरोग्यासंबंधित काळजी घेण्याचे आवाहन)
दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाची पातळी पाहता, राजधानीच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून स्वच्छ हवा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने धोकादायक हवेच्या गुणवत्तेचे कारण देत शाळा बंद ठेवण्याची शिफारस केली होती. यामुळे गुरुवारी व शुक्रवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर गुरुवार हा बालदिन होता, परंतु वाढते प्रदूषण लक्षात घेता विद्यार्थ्यांनी बालदिनही साजरा केला नाही.