झारखंड: सरायकेला भागात IED ब्‍लास्‍ट; कोब्रा युनिट चे 8 तर पोलिस दलातील 3 जवान जखमी

झारखंड येथे विशेष मोहिमेवर जात असलेल्या कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीवर आयईडी बॉम्ब हल्ला करण्यात आला.

Representational Image (Photo Credit: PTI)

झारखंड (Jharkhand) येथे विशेष मोहिमेवर जात असलेल्या कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीवर आयईडी बॉम्ब हल्ला (IED Blast) करण्यात आला. रांची येथील सरायकेला परिसरातील काही भागात हे ब्लॉस्ट झाले. यात कोब्रा युनिटचे 8 जवान आणि झारखंड पोलिस दलातील 3 जवान जखमी झाले आहेत.

जखमी जवानांना घटनास्थळावरुन विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने रांचीला नेण्यात आले. काही जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मात्र हा हल्ला नेमका कसा झाला, हे कळू शकलेले नाही.

ANI ट्विट:

झारखंड येथील अनेक भाग हे नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली आहेत. या ठिकाणी नक्षलवादी अतिशय सक्रिय आहेत आणि ते अनेकदा सुरक्षा रक्षकांवर निशाणा साधतात. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सक्रियतेमुळे नक्षलवाद्यांच्या कुरापतींवर काही प्रमाणात लगाम लावण्यात यश आले आहे.