अमूलच्या 'दुधात प्लास्टिक असलेला' व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीवर कंपनीने दाखल केला गुन्हा; ग्राहकांची दिशाभूल करण्याचा परिणाम

आता कंपनीने हा आरोप फेटाळून लावत, दिशाभूल करणाऱ्या या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला

Amul Hikes Milk Prices (Photo Credit: PTI)

सध्या अमूल दुधाचा (Amul Milk) एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, अमूल कंपनी भेसळयुक्त दूध विकत आहे. या व्हिडिओमध्ये, अमूल गोल्डचे दूध उकळल्यानंतर असे दिसते की, ते प्लास्टिकपासून बनलेले आहे. आता कंपनीने हा आरोप फेटाळून लावत, दिशाभूल करणाऱ्या या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुजरातमधील आणंद यथील अमूल ब्रँडच्या दुधाचे मालक, सहकारी दूध विपणन महासंघ (जीसीएमएमएफ) यांनी शनिवारी प्रयागराज येथे गुन्हा दाखल केला आहे.

वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, प्रयागराज येथील रहिवासी आशुतोष शुक्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा करून व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, अमूलच्या दुधापासून दही यामुळे बनते कारण त्यात प्लास्टिक आहे आणि ते विषारी देखील असू शकते. जीसीएमएमएफच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली होती, असे या तक्रारीत म्हटले आहे. मात्र जेव्हा अधिकाऱ्यांनी खोटी माहिती पसरविणे थांबविण्याची विनंती केली, तेव्हा आरोपीने दहा लाख रुपयांची मागणी केली. (हेही वाचा: महागाईचा भडका! 3 रुपयांनी वाढल्या अमूल-मदर डेयरी यांच्या दुधाच्या किंमती, जाणून घ्या नवे दर

पहा व्हिडीओ -

या प्रकरणात शुक्लाविरोधात आयपीसी कलम 386 (वसुली), कलम 499 (मानहानी) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना, जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोधी म्हणाले की, 'याबाबत अमूलला असा संदेश द्यायचा आहे की, जर कोणी आमच्या उत्पादनांबाबत सोशल मीडियावर ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कारवाई नक्क्कीच केली जाईल.' तसेच त्यांनी दुधापासून दही बनवण्याचे प्रक्रिया सोपी नाही असेही सांगितले.