Amit Shah Admitted To AIIMS: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती, नुकतीच केली होती कोरोनावर मात
यापूर्वी अमित शाह यांची कोरोना चाचणी शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी निगेटिव्ह आली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना मंगळवारी दिल्लीच्या एम्स (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी अमित शाह यांची कोरोना चाचणी शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी निगेटिव्ह आली होती. मात्र आता दोन दिवसांपासुन शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना निरिक्षणासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इथे तज्ञ डॉक्टरांंच्या देखरेखीखाली शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत. केंद्रीय गृहमंंत्रालयाने याबाबत पत्रक प्रसिद्ध करत माहिती दिली आहे. शाह यांची प्रकृती स्थिर असुन त्यांंना खबरदारी म्हणुन हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आल्याचे सुद्धा या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांना 2ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत स्वतः शाह यांंनी ट्विट करुन माहिती दिली होती, तसेच 14 ऑगस्ट रोजी शाह यांंनी कोरोनावर मात केल्यावर सुद्धा अमित शाह यांनी माहिती दिली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस घरी अलिप्त राहू असेही ते पुढे म्हणाले होते, 15 ऑगस्ट रोजी त्यांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण सुद्धा केले होते.
ANI ट्विट
दरम्यान अमित शाह हे कोरोनाग्रस्त असताना भाजपचे खासदार मनोज तिवारी यांंनी 9 ऑगस्ट रोजी शाह कोरोना मुक्त झाल्याची माहिती दिली होती. मात्र तेव्हा ही माहिती चुकीची असल्याचे सांंगत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. शाह यांची प्रकृती स्थिर असुन या संदर्भात अफवांंवर विश्वास ठेवु नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.