Akash Anand Political Journey And Career: आकाश आनंद राजकीय प्रवास, वय, शिक्षण आणि कारकीर्द; घ्या जाणून
त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांची निवड केली आहे. घ्या जाणून कोण आहे आकाश आनंद?
Akash Anand Political Successor Of Mayawati: आकाश आनंद, उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय पक्षांच्या राजकीय कामगिरीमध्ये या नावाची आता वारंवार चर्चा होईल. बहुजन समाज पक्ष (BSP) प्रमुख मायावती यांनी आजच (10 नोव्हेंबर) अधिकृत घोषणा केली की आकाश आनंद (Akash Anand Political Journey) हेच आपले राजकीय उत्तराधिकारी असतील. सहाजिकच बसपा कार्यकर्ते, उत्तर प्रदेश आणि देशातही त्यांच्या नावाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचे आणि स्वत:ची राज्ये वगळता राजकीय पक्षांच्या नेतृत्वाबद्दल ज्यांना फारसे माहिती नाही अशांना आकाश आनंद कोण आहेत? (Who IS Akash Anand) याबाबत उत्सुकता वाटू लागली. अनेकांना त्यांचे शिक्षण, राजकीय कारकीर्द आणि एकूण जीवनप्रवास याबद्दलही प्रचंड रुची दिसून आली. अशा वाचकांसाठी त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडक्यात.
'बसपचे राष्ट्रीय समन्वयक'
मायावतींचे राजकीय उत्तराधिकारी आकाश आनंद सध्या बसपचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामधील बसपाच्या राजकीय सभा, निर्णय आणि धोरण निश्चिती यामध्येही सक्रीय सहभाग नोंदवला आहे. दलित, धार्मिक अल्पसंख्याक, ओबीसी आणि आदिवासींशी संबंधित प्रमुख समस्यांवर लक्ष केंद्रित करून पक्षाच्या निवडणूक प्रचाराची तयारी आणि प्रारंभ करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून मायावती यांनीही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. (हेही वाचा, Mayawati Announces Successor: मायावती यांचा उत्तराधिकारी म्हणून Akash Anand यांच्या नावाची घोषणा)
एमबीए पदवीधर, वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश
आकाश आनंद यांनी लंडन येथून एमबीएची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सन 2017 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेश राज्यातील सहारनपूर येथील बसपच्या एका रॅलीमध्ये पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यासोबत त्यांनी उपस्थिती लावली. तोच दिवस त्यांचा राजकारणातील प्रवेश म्हणून ओळखला जातो. सन 2019 मध्ये त्यांनी आग्रा येथे त्यांच्या पहिल्या रॅलीला संबोधित केले. उल्लेखनीय असे की, बसपा तेव्हा महागठबंधनचा भाग होता. (हेही वाचा, मायावतींचा BSP ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष; BJP पाचव्या स्थानावर, जाणून घ्या एकूण संपत्ती)
'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय'
आकाश आनंद यांनी अलिकडेच 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' संकल्प यात्रा काढली होती. ज्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. ज्यामुळे बसपाची जनमानसातील प्रतिमा उजळण्यास मदत झाली. लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने बसपामधील आनंद यांची निवड अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
व्हिडिओ
मायावती यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आणि न होणाऱ्याही प्रत्येक बैठकीसाठी आकाश आनंद उपस्थित असतात. सध्या वय वर्षे 28 असलेले आनंद यांना आगामी काळात बसपचे उमदे नेतृत्व म्हणून पुढे आणण्यात मायावती प्रयत्नशील आहेत. आकाशही सोशल मीडिया खास करुन Instagram वर शिक्षण, सशक्तीकरण आणि समानतेसाठी उभा असलेला "बाबा साहेबांच्या व्हिजनचा तरुण समर्थक" म्हणून स्वत:ची ओळख करुन देतो.