Airtel Partners with Blinkit: एअरटेल ने ब्लिंकिट सोबत केली भागीदारी; मुंबईत घरबसल्या 10 मिनिटांत मिळणार सीम कार्ड

लाँचच्या सुरुवातीच्या टप्प्यात सिम पोहोचविण्याची सेवा 16 प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असेल. यात मुंबई, अहमदाबाद, सुरत, चेन्नई, दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, सोनीपत, भोपाळ, इंदूर, बेंगळुरू, पुणे, लखनौ, कोलकाता, जयपूर आणि हैदराबाद या शहरांचा सामील आहेत.

Airtel (PC - Twitter/ANI)

आजकाल लहान वस्तू देखील विकत घेण्यासाठी अनेक जण  क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म  वर अवलंबून असतात. आता एअरटेलचं सीम देखील घरबसल्या मिळणार आहे. भारती एअरटेलने  आज (Airtel) ब्लिंकिट (Blinkit) या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. मुंबईत आता ग्राहकांना अवघ्या 10 मिनिटांत सिमकार्ड येणार आहे. एखाद्या टेलिकॉम कंपनी कडून ही पहिलीच सेवा असून आता देशातील 16 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे आणि टप्प्याटप्प्याने अधिक भागांमध्ये पोहचणार आहे.

एअरटेलच्या ग्राहकांना आता 49 रूपयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे. दहा मिनिटांत त्यांना सिमकार्ड मिळणार आहे. हे सीमकार्ड ग्राहकाला आधारवर आधारित के.वाय.सी प्रमाणीकरण करून अ‍ॅक्टिव्ह करता येणार आहे. ग्राहकांना पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लॅन्स मधून निवड करण्याचा किंवा एअरटेल नेटवर्कमध्ये पोर्टिंगसाठी एम.एन.पी सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाईल. ग्राहकांना प्रक्रिया सुलभ सक्रिय करण्याचा अनुभव मिळावा म्हणून ऑनलाइन लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहता येईल.अशा पद्धतीने अ‍ॅक्टिव्ह केलेल्या सर्वांसाठी एअरटेल ग्राहकांना कोणतीही मदत हवी असल्यास, एअरटेल थँक्स अ‍ॅप द्वारे मदत केंद्रात जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

नवीन ग्राहकांना 9810012345 वर कॉल करून सपोर्टशी संपर्क करून मदत घेता येईल. सिमकार्ड मिळाल्यावर ग्राहकांना 15 दिवसांच्या आत सिम अ‍ॅक्टिव्ह करणे बंधनकारक असेल, जेणेकरून सुरळीत आणि त्रास न होता स्थित्यंतर करता येईल.

"एअरटेलमध्ये आम्ही जे काही करत आहोत त्यात ग्राहकांचे जीवन सोपे करणे केंद्रस्थानी ठेवलेले असते. आज आम्ही खूप आनंदी आहोत कारण आम्ही 16 शहरांमधील ग्राहकांच्या घरी 10 मिनिटांमध्ये सिमकार्ड पोहोचविण्यासाठी ब्लिंकिटसोबत भागीदारी केलेली आहे आणि कालांतराने आम्ही अतिरिक्त शहरांमध्ये या भागीदारीचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे." असे सांगण्यात आले आहे.

अल्बिंदर धिंडसा, संस्थापक आणि सी.ई.ओ. ब्लिंकिट यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ग्राहकांना वेळ आणि त्रास वाचविता यावा म्हणून निवडक शहरांमधील थेट ग्राहकांपर्यंत सिमकार्ड अवघ्या 10 मिनिटांत पोहोचवण्यासाठी आम्ही एअरटेल सोबत सहकार्य केलेले आहे. ब्लिंकिट पोहोचविण्याची काळजी घेत आहे. तर एअरटेल ग्राहकांना स्वतः के.वाय.सी पूर्ण करण्यास, त्यांचे सिम अ‍ॅक्टिव्ह करण्यास आणि प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन्सपैकी एक निवडण्यास सुलभता दिली जाणार आहे. ग्राहकाला नंबर पोर्टेबिलिटी सुद्धा निवडता येईल आणि हे सर्व त्यांच्या सोयीनुसार केले जाणार आहे." या

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement